शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

बांबवडे -डोणोली येथे तिघांवर चाकूहल्ला, तीन लाखाचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 6:07 PM

Crimenews Police Kolhapur : बांबवडे व डोणोली तालुका शाहुवाडी येथे झालेल्या चोरीत दोन लाख ९० हजार २५० रुपये चा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला. यामध्ये विरोध करणाऱ्या तिघांवर चोरट्यांनी चाकू हल्ला केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले .घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडीचे प्रभारी उपधीक्षक आर. आर. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.

ठळक मुद्देबांबवडे -डोणोली येथे तिघांवर चाकूहल्लातीन लाखाचा ऐवज लंपास 

बांबवडे : बांबवडे व डोणोली तालुका शाहुवाडी येथे झालेल्या चोरीत दोन लाख ९० हजार २५० रुपये चा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला. यामध्ये विरोध करणाऱ्या तिघांवर चोरट्यांनी चाकू हल्ला केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले .घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडीचे प्रभारी उपधीक्षक आर. आर. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी रात्री १ च्या दरम्यान डोणोली येथील लक्ष्मी आनंदा शेळके यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकू हल्ला केला. हातातील सोन्याच्या पाटल्या कटरने कट करून चोरट्यांनी पाकिटातील ७५० रुपये रोख असा एकूण १ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.गोंधळ ऐकून जागे झालेल्या आनंदा दादू शेळके यांनी चोराला पकडले. परंतु दुसर्‍या चोरांनी त्याच्या हातावर चाकूचा वार केला व पळून गेले. या चोरांनी डोणोली येथेच प्रदीप सुदाम पाटील व विजय शहाजी कांबळे यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु घरातील लोक जागे झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चोरांचा येथे चोरी करण्याचा प्रयत्न फसला.

या घटनेनंतर रात्री २.३० च्या दरम्यान चोरांनी आपला मोर्चा बांबवडेकडे वळवला. येथे सरूड रोडवरील विजया महादेव पाटील या वृद्धेच्या घराचे दार उघडून तिच्यावर चाकू हल्ला केला व रोख रकमेसह एकूण १ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.या संपूर्ण घटनेने बांबवडे व डोणोली परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहुवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथक, सायबर पथक, श्वान पथक ,फॉरेन्सिक लॅब पथक ,ही पथके चोरीचा छडा लावण्यासाठी तैनात झाली होती. पुढील तपास शाहुवाडी पोलिस करत आहेत.

सासऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.डोणोली येथील लक्ष्मी आनंदा शेळके यांच्यावर एका चोराने व त्यांच्या सुनेवर दुसऱ्या चोराने झडप घातली होती. गोंधळ ऐकून जागे झालेल्या आनंद शेळके यांनी सुनेवर हल्ला करणाऱ्या चोरास पकडले. तोपर्यंत दुसऱ्या चोराने उठून त्यांच्यावर चाकू हल्ला केला व पळून गेले. सासऱ्याच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर