शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Crime News in Kolhapur: जगतापनगरमधील तरुणाच्या खून प्रकरणी तिघे संशयित ताब्यात; पूर्ववैमनस्यातून खुनाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:59 AM

घटनास्थळी दारूचे ग्लास, गांजाच्या पुड्या

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या हद्दीतील जगतापनगर येथे जोतिर्लिंग शाळेजवळ एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (२४, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयिताना ताब्यात घेतले असून, आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

मृत ऋषिकेश याच्यावर लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. स्टेशन रोड येथील एका व्हिडीओ गेम पार्लरमध्ये तो कामाला होता. बुधवारी सायंकाळी साडेसहानंतर तो घरातून बाहेर पडला होता. घरी त्याचे आई-वडील असतात.जगतापनगर येथील जोतिर्लिंग विद्यामंदिर शाळेजवळ गुरुवारी सकाळी काही शालेय मुले खेळत होती. खेळताना त्यांचा बॉल ओढ्याकडे गेला. बॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलांना एक मृतदेह दिसला. मुले आरडाओरडा करीत शाळेकडे पळाली. त्याचवेळी शाळेजवळ राहणाऱ्या एका महिलेने मुलांकडे चौकशी केल्यानंतर खुनाच्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी करवीर पोलिसांना फोन करून कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला.मृतदेहाच्या पँटच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. चाकूने पोटात, छातीवर वार केल्यानंतर हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला. याबाबत मृत ऋषिकेशची आई माधवी महादेव सूर्यवंशी (५०, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली असून, दोन तरुणांवर संशय व्यक्त केला आहे.

तातडीने शोधखुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने संशयितांचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी स्वतंत्र पथकांद्वारे दिवसभरात तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. आर्थिक वाद आणि पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटाखुनाच्या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोरले यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. जयश्री देसाई यांनी तपासाबद्दल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

घटनास्थळी दारूचे ग्लास, गांजाच्या पुड्याजगतापनगरातील ओढ्याकडेला दाट झाडीत दारूचे तीन ग्लास, काही बाटल्या आणि गांजाच्या पुड्या पडल्या होत्या. काही अंतरावरच ऋषिकेश याचा मृतदेह पडला होता. त्याच्या बाजूला रक्ताने माखलेला मोठा दगड होता, तर बाजूच्या झाडांवर रक्ताने माखलेले हात पुसल्याच्या खुना दिसत होत्या.

दुचाकी, मोबाइल लंपासघटनास्थळावर पोलिसांना ऋषिकेशची दुचाकी आणि मोबाइल मिळाला नाही. हल्लेखोरांनीच त्याची दुचाकी आणि मोबाइल पळवला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चौकशीला ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून खुनाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस