शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
2
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
3
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
4
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
5
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
6
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
7
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
8
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
9
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
10
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
12
श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची मुंबईत नवीन खरेदी; अपार्टमेंटची किंमत ऐकून बसेल धक्का
13
१० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? 
14
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
15
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
16
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
17
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
18
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
19
धक्कादायक! ॲमेझॉन जंगलात अंदाधुंद वृक्षतोड; दोन देशांच्या क्षेत्रफळाइतके जंगल साफ...
20
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव

तीन हजार कोल्हापूरकरांनी घेतला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:16 AM

कोल्हापूर : कोल्हापुरातून परदेशात शिक्षण, नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गेल्या दहा वर्षांत २,९१५ जणांनी असे एक ...

कोल्हापूर : कोल्हापुरातून परदेशात शिक्षण, नोकरीनिमित्त जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गेल्या दहा वर्षांत २,९१५ जणांनी असे एक वर्षाच्या कालावधीसाठी वाहन चालविण्याचे आंतरराष्ट्रीय परवाने काढले. सरासरी २९० जण प्रतिवर्षी असे परवाने काढत होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गामुळे परदेशात जाण्याचा आणि आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना काढण्याचा वेग मंदावला आहे.

कोल्हापुरातून शेकडो विद्यार्थी दरवर्षी अमेरिका, इंग्लड, स्वीत्झर्लंड,जर्मनी, फ्रान्स, अरब अमिरात, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, आदी देशांत उच्च शिक्षणासाठी जातात तर तितक्याच प्रमाणात नोकरीसाठीही जातात. अशा विद्यार्थी व नोकरदार मंडळींना परदेशातही आपली चारचाकी लागते. कारण परदेशात ४०० ते ५०० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. शिवाय वाहन चालविण्याबाबतचे नियम अत्यंत कडक आहेत. तेथील नियमांना अधिन राहून भारतातही असे आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना व्हिसा, आधारकार्ड, पासपोर्ट, स्थानिक वाहन चालविण्याचा परवाना अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर मिळतो. मुदत संपल्यानंतर ते परदेशातून मायदेशी आले तर पुन्हा मुदतवाढ करून घेतात. अन्यथा मागील वर्षीपासून परराष्ट्र मंत्रालयाने ज्या देशात उमेदवार असेल, त्या देशातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जाऊन या परवान्याचे नूतनीकरण करता येते. त्याकरिता तेथे दुप्पट शुल्क आकारले जाते.

इंटरनॅशनल लायसन्स

२०१२ - २०३

२०१३ - ४६३

२०१४ - ३९८

२०१५ - ४२१

२०१६ - ३०१

२०१७ - ४५१

२०१८- ३५५

२०१९- २०७

२०२०- ७९

२०२१ - ३७

मुदत एक वर्ष अथवा व्हिसा मुदत असेपर्यंत

सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवान्याची मुदत एक वर्षाची असते. त्यानंतर या लायसन्सची मुदत आपोआप संपते. जर हा परदेशस्थ भारतीय पुन्हा मायदेशी आला आणि त्याने भारतातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात पुन्हा सर्व योग्य ती कागदपत्रे सादर केल्यानंतर पुन्हा एक वर्षाचा परवाना मिळू शकतो. ज्या भारतीयांना पुन्हा मायदेशी येणे शक्य नसते, त्यांच्याकरिता भारत सरकारने त्या-त्या देशातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात मुदतवाढ मिळण्याची सोय केली आहे. त्याकरिता एक वर्षाचा परवाना हवा असेल तर दोन हजार रुपये शुल्क आकारले जाते.

कागदपत्रे

व्हिसा, पासपोर्ट, आधारकार्ड, स्थानिक वाहन चालविण्याचा परवाना व एक हजार रुपये शुल्क भरल्यानंतर हा परवाना कुठल्याही भारतीय नागरिकाला मिळू शकतो.

व्हिसा असेल तरच मिळतो परवाना

ज्या उमेदवाराकडे परदेशातील व्हिसा, पासपोर्ट, स्थानिक वाहन चालविण्याचा परवाना असेल तर त्याला एक वर्षाच्या मुदतीकरिता असा परवाना मिळू शकतो. हा परवाना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून उपप्रादेशिक अथवा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहीने मिळू शकतो.

कोट

कोरोना संसर्गामुळे कोल्हापुरातून परदेशात नोकरी, शिक्षणाकरिता जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना काढणाऱ्यांची संख्या रोडावली आहे.

- रोहित काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर