कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईत होणाऱ्या महाअधिवेशनास कोल्हापूर जिल्ह्यातून तीन ते साडेतीन हजार पदाधिकारी जाणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी शासकीय विश्रामगृहात झाली. गेली अनेक वर्षे गटातटांत विखुरलेली ‘मनसे’ संघटना या निमित्ताने एकत्र असल्याचा दावा, या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव होते.विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन समीकरणे आकारास येऊन शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची आघाडी सत्तेवर आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ‘मनसे’ची भूमिका काय राहणार, याबाबत उत्सुकता आहे.‘मनसे’ची राजकीय दिशा स्पष्ट करण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे महाअधिवेशन २३ जानेवारीला मुंबईत आयोजित केले आहे. महाअधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तीन हजार पदाधिकारी उपस्थित राहणार असून, पक्षप्रमुख राज ठाकरे जो आदेश देतील, त्याप्रमाणे आगामी काळात एकसंधपणे काम करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, विजय करजगार, राजू जाधव, हुपरीचे नगरसेवक दौलत पाटील, वडगावचे नगरसेवक संतोष चव्हाण, अभिजित राऊत, नीलेश लाड, रणजित वरेकर, अमित पाटील, अभिजित पाटील, आदी उपस्थित होते.बारकोड पाहूनच प्रवेश‘मनसे’च्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी पदाधिकाºयांना बारकोड असलेल्या प्रवेशिका दिल्या जाणार आहेत. नोंदणीकृत प्रवेशिका पाहूनच त्यांना आत सोडले जाणार असून, त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी केले.