मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील ३ हजार २४५ नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. त्यातील १ हजार ६४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनी दिली.
शाहूवाडी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने ३ हजार २४५ नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट, १ हजार ७० नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये १ हजार ६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. पेरीड कोविड सेंटर व अल्फोन्सा कोविड सेंटर येथे ५७१ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. ४५४ रुग्ण कोरोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. ४२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.