शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
4
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
5
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
6
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
7
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
8
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
9
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा
10
Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले 
11
वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- "स्वॅग असावा तर असा!"
12
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
13
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
14
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
15
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
16
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
17
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
18
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
19
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
20
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!

Kolhapur: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस तीन वर्षांचा कारावास

By उद्धव गोडसे | Published: April 16, 2024 5:55 PM

मुलीची आई घरामागे भांडी घासत असताना त्याने स्वयंपाक घरात मुलीचा विनयभंग केला

कोल्हापूर : कसबा बावडा येथील गोळीबार मैदान परिसरात अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी सुरेश हिंदुराव कांबळे (वय ५२, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) याला जिल्हा व प्रमुख न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दोषी ठरवले.आज, मंगळवारी (दि. १६) झालेल्या सुनावणीत कांबळे याला तीन वर्षाचा सक्त कारावास, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. विनयभंगाचा गुन्हा १७ ऑगस्ट २०२१ रोजी घडला होता.विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश कांबळे याचे पीडित मुलीच्या घरी जाणे-येणे होते. १७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी अडीचच्या सुमरास कांबळे हा पीडित मुलीच्या घरात गेला. मुलीची आई घरामागे भांडी घासत असताना त्याने स्वयंपाक घरात मुलीचा विनयभंग केला.याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. एस. पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करून कांबळे याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ॲड. कुलकर्णी यांनी न्यायाधीश अग्रवाल यांच्यासमोर पाच साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य घरून न्यायाधीश अग्रवाल यांनी आरोपीस दोषी ठरवले.

बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार त्याला शिक्षा सुनावली. सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश परीट आणि शंकर माने यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय