शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सिंहासनाधिष्ठित अंबाबाई

By admin | Published: October 02, 2016 12:50 AM

शारदीय नवरात्रौत्सवाला थाटात प्रारंभ : पहिल्याच दिवशी दीड लाख भाविक

कोल्हापूर : दुष्टांचे निर्दालन करून आपल्या भक्तांचे रक्षण व पालन करणाऱ्या आदिशक्तीच्या आराधनेच्या शारदीय नवरात्रौत्सवाला शनिवारपासून थाटात प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईची पहिल्या माळेला सिंहासनाधिष्ठित अंबाबाई रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. पंचामृताचा अभिषेक, तोफेची सलामी, घटस्थापना, आरती, पालखीपूजन, मंत्रोच्चार अशा धार्मिक व मंगलमय वातावरणाने कोल्हापूरकर अंबेच्या भक्तिरसात न्हाऊन निघाले. रात्री अंबाबाईची पालखी एक शिखर आकारात काढण्यात आली; तर भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीची खडी सालंकृत पूजा बांधण्यात आली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी दीड लाख भाविकांनी अंंबाबाईचे दर्शन घेतले. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेनिमित्त पहाटे पावणेपाच वाजल्यापासून देवीचे दर्शन सुरू करण्यात आले. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीनंतर मूळ घराणे श्रीपूजक शेखर मुनीश्वर यांच्या हस्ते मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी सपत्निक अंबाबाईचा पहिला अभिषेक केला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, श्रीमंत मालोजीराजे, मधुरिमाराजे, संयोगिताराजे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, राजलक्ष्मी खानविलकर यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दुपारची आरती झाल्यानंतर अंबाबाईची सिंहासहानाधिष्ठित अंबाबाई रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. यादिवशी घटस्थापना, अखंड नंदादीप, पुष्पमालाबंधन, चंडीपाठ होऊन देवी उपासना, कुळाचाराला व नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत असल्याने देवीची बैठी पूजा बांधली जाते. या दिवसापासून महानवमीपर्यंत देवी भक्तांच्या उपासना स्वीकारत सुखाने सिंहासनावर विराजमान होते आणि भक्तांना आशीर्वाद देते, हे या पूजेमधून दर्शविण्यात आले. ही पूजा दिवाकर ठाणेकर, आशुतोष ठाणेकर, सचिन ठाणेकर, मिलिंद दिवाण व प्रसाद लाटकर यांनी बांधली. मंदिरात दिवसभरात विश्वकर्मा महिला सोंगी भजनी मंडळ, राधा महिला भजनी मंडळ, स्वरमाउली भजनी मंडळ, स्वरानंद संगीत वाद्यवृंद, महालक्ष्मी भजनी मंडळ, शिवशाहू पोवाडा मंच या संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी एक शिखर आकारात काढण्यात आली. महापौर अश्विनी रामाणे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पालखीचे पूजन केले. जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानीची सालंकृत खडी पूजा बांधण्यात आली. ही पूजा बाळकृष्ण दादर्णे, अमर झुगर, सारंग दादर्णे, विजय बनकर यांनी बांधली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला. भक्तिमय वातावरण झाले होते.