शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

इंग्रजी माध्यमातून ११00 विद्यार्थी जि. प. शाळांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:22 AM

कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.करवीर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५४७ विद्यार्थ्यांनी आपली मूळ शाळा सोडली आहे. यामध्ये ...

कोल्हापूर : सरत्या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १११९ इंग्रजी माध्यमातील, तर ५६९ खासगी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी शैक्षणिक योजना आणि विविध उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.करवीर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५४७ विद्यार्थ्यांनी आपली मूळ शाळा सोडली आहे. यामध्ये २८९ इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुरुवातीला अनेक पालकांनी इंग्रजी माध्यम आणि खासगी शाळांमधील वातावरण पाहून पाल्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे जिल्हाभर खासगी आणि इंग्रजी शाळांची संख्याही भरमसाठ वाढलीे. याचा विपरीत परिणाम जिल्हा परिषदांच्या शाळांवर झाला. मात्र, सध्या जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू ठेवल्याने या शाळांकडे कल वाढला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल विद्यार्थीतालुका प्रवेशित इंग्रजी माध्यमातून खासगी शाळेतून एकूणशाळा जि. प. शाळेत जि. प. शाळेतआजरा ९ ३७ ११ ४८भुदरगड १७ ५३ २४ ७७चंदगड २२ ४४ १६ ६0गडहिंग्लज ५२ १00 ७२ १७२गगनबावडा ३ ५ 0 ५हातकणंगले ३९ ८४ ८0 १६४कागल ६२ १८३ 0 १८३करवीर ८९ २८९ २५८ ५४७पन्हाळा ३२ ६४ २६ ९0राधानगरी ३६ ८0 १ ८१शाहूवाडी २२ ७४ १३ ८७शिरोळ ४२ १0६ ६८ १७४एकूण ४२५ १११९ ५६९ १६८८जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० टक्के डिजिटल शाळा, माध्यान्ह भोजन योजना, विज्ञान प्रयोगशाळा, इस्रो भेट असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रह धरला जात असून, याचाच परिणाम म्हणून जि.प.च्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.- अंबरीश घाटगे, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूरसर्व शिक्षा अभियान, ज्ञानरचनावादी शिक्षण, शाळाबाह्य व दिव्यांग बालकांच्या शिक्षणाची सुविधा अशा अनेक योजनांमुळे पालकांची मानसिकता बदलत आहे. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षेचे निकाल उच्च दर्जाचे आहेत. या सगळ्यांचा विचार करून पालक निर्णय घेत असल्याने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रवेश होत आहेत.- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर