शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

कोल्हापूर :दिनदर्शिकेच्या माध्यमातून करवीर निवासीनी आई अंबाबाई देवीचे दर्शन, अंबाबाई-जोर्तिलिंग दिनदर्शिकेचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 4:32 PM

करवीर निवासीनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. ज्या भाविकांना देवीच्या दारापर्यंत येता येत नाही अशांना चित्र रुपी दिनदर्शिकेच्या माध्यमातून देवीचा महीमा कळेल. त्यामुळेच ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देअंबाबाई, जोर्तिलिंग यांच्या सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे दिनदर्शिका

कोल्हापूर : करवीर निवासीनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. ज्या भाविकांना देवीच्या दारापर्यंत येता येत नाही अशांना चित्र रुपी दिनदर्शिकेच्या माध्यमातून देवीचा महीमा कळेल. त्यामुळेच ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी केले.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अंबाबाई मंदीरातील गारेच्या गणपतीसमोरील पटांगणात मंगळवारी आयोजित केलेल्या अंबाबाई व जोर्तिलिंग यांच्या सचित्र दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

जाधव म्हणाले, दिनदर्शिकेच्या माध्यमातून आई अंबाबाई प्रत्येकाच्या घरात असावी. या उद्देशाने प्रथमच ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. दिवसागणीक देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक रोज येत आहेत. त्यांच्याकरीता सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न देवस्थान समिती करीत आहे.

येत्या काही दिवसांत मंदीर उघडल्यापासून बंद होईपर्यंत भक्तांच्या सोईकरीता प्रथमोपचारासाठी दोन डॉक्टरांचीही नेमणुक केली जाईल. यासह देवस्थानचे अन्नछत्र व भक्त निवास उभे करण्याचा मानस आहे.

मंदीराचा इतिहास व धार्मिकता जपण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यातून मंदीराच्या परिसरातील विविध छोटी मंदीरे ही भक्तांना पाहण्यास खुली केली जातील.

देवस्थानच्या अखत्यारित असलेल्या ३०४२ मंदीरे व हजारो एकर जमीन असून त्याचेही व्यवस्थान करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने समिती सदस्य विविध मंदीरांना भेटी देऊन तेथील अडचणी समजावून घेत आहेत, अशीही माहिती महेश जाधव यांनी यावेळी दिली.

प्रास्ताविक सहसचिव शिवाजी साळवी यांनी केले. यावेळी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य बी.एन.पाटील मुंगळीकर, प्रमोद पाटील, संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन नंदकुमार मराठे यांनी केले.दर शुक्रवारी दुपारी २ ते ४ या दरम्यान महीला भक्तांकरीता मोफत कुंकूमार्चन कार्यक्रम आयोजित केला जात आहे. त्यात विधीनंतर श्रीयंत्रही मोफत दिले जाते. याकरीता भक्तांनी नाव नोंदणी सोमवारपुर्वी करणे बंधनकारक आहे. तरी याचा लाभ घेण्याचे आवाहनही जाधव यांनी केले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर