शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
6
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
7
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
8
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
9
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
10
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
11
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
12
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
13
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
14
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
15
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
16
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
17
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
18
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
19
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
20
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 

महानगरपालिका समितीकडून धारेवर

By admin | Published: May 07, 2016 12:36 AM

अनुसूचित जाती कल्याण समितीचा सवाल ो

कोल्हापूर : राजेंद्रनगरातील गोरगरीब लोकांच्या झोपड्या कोणाच्या सांगण्यावरून पाडल्या, असा खडा सवाल अनुसूचित जाती कल्याण समितीने विचारताच महानगरपालिका प्रशासनाची भंबेरी उडाली. शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत याच प्रश्नावरून आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांना समितीने धारेवर धरले आणि कायद्याची पुस्तके त्यांच्यासमोर फेकत कोणत्या आधारे कारवाई केली ते सांगा, असा आग्रह धरला. बैठकीत समिती सदस्यांच्या समोरच नगरसेवक भूपाल शेटे यांनी आयुक्त व अधिकाऱ्यांनी संगनमत करून तसेच सुपारी घेऊन झोपड्या पाडल्याचा आरोप करताच आयुक्त पी. शिवशंकर संतप्त झाले. खोट्या आरोपाबद्दल तुमच्या विरोधात खटला भरण्यात येईल, असा दम त्यांनी शेटे यांना दिला. बैठकीतील वातावरण तापले; परंतु महापालिका प्रशासनातील एकाही अधिकाऱ्यास झोपड्या पाडल्याबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय नियुक्त अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुरेश खाडे, सदस्य डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश गजबिये, अशा तीन सदस्यांनी शुक्रवारी महानगरपालिकेस भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीस महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, परिवहन समिती सभापती लाला भोसले यांच्यासह अनेक नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अगदी सुरुवातीलाच राजेंद्रनगर झोपडपट्टीतील झोपड्या पाडल्याचा कळीचा मुद्दा उपस्थित झाला. झोपड्या पाडण्यापूर्वी संबंधित लोकांची पर्यायी व्यवस्था करायची असते. याबाबत सौजन्य न दाखविताच अचानक कशी कारवाई केली, कोणाच्या सांगण्यावरून झोपड्या पाडल्या, त्या पाडताना कायद्यातील कोणत्या तरतुदींचा आधार घेतला, असे अनेक प्रश्न समिती सदस्यांनी उपस्थित करून अधिकाऱ्यांची बोलती बंद करून टाकली. समितीचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना याप्रकरणी चांगलेच धारेवर धरले. खालचे अधिकारी काहीही सांगतील, त्यांचे तुम्ही ऐकणार का? असा सवाल आयुक्तांना विचारला गेला. कोणत्या कायद्यानुसार कारवाई केली, हे दाखवा असे म्हणत प्रकाश गजबिये यांनी आयुक्तांसमोर कायद्याचे पुस्तक फेकले. पाडलेल्या झोपड्या २००० सालापूर्वीच्या आहेत, अशी माहिती पुढे आली तेव्हा आयुक्त शिवशंकर यांनी त्या झोपड्या २००४ सालानंतरच्या होत्या, असा खुलासा केला. त्यावेळी खाडे यांनी त्यांची पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, अशी विचारणाही केली. ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली त्या उपशहर अभियंता एस. के . माने यांना बोलावून अध्यक्ष खाडे यांनी खरडपट्टी केली. ज्यांना तुम्ही रस्त्यावर आणले, त्यांच्यावरची कारवाई चुकीची आहे, हे स्पष्ट झाले तर तुमच्यावर काय कारवाई करायची? असे सवाल करताच माने यांची भंबेरी उडाली. दौरा : पंधरा पैकी तीनच सदस्य उपस्थितअनुसूचित जाती कल्याण समितीवर अध्यक्ष सुरेश खाडे यांच्यासह १५ सदस्यांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून दौऱ्यावर असणाऱ्या या समितीचे खाडे यांच्यासह केवळ तीनच सदस्य महानगरपालिकेतील बैठकीस उपस्थित होते. बैठकीच्या निमित्ताने अल्पोपहार, चहापाणी व्यवस्था मात्र चोख ठेवली होती. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांची ड्युटीच लावण्यात आली होती.