कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या टोपीचे दार उचकटून सुमारे ३७ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही चोरी बुधवारी (दि. २९) सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाली. या प्रकरणी फिर्याद संभाजी शंकर वळके (वय ५२, रा. निगवे दुमाला) यांनी करवीर पोलीस ठाण्यात गुरुवारी दिली.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे गंठण वजन ५० ग्रॅम (किंमत एक लाख रुपये), सोन्याचा हार वजन १५ ग्रॅम (किंमत ३० हजार), सोन्याचे तोडे एक जोड वजन ४५ ग्रॅम (किंमत ९० हजार), सोन्याचे चिताक वजन ४० ग्रॅम (किंमत ८० हजार), सोन्याचे टॉपवेल १० ग्रॅम (२० हजार), सोन्याची रिंग जोड वजन ५ ग्रॅम (किंमत १० हजार), सोन्याच्या साखळीचे ब्रेसलेट वजन १० ग्रॅम (किंमत २० हजार), बालाजी लॉकेट वजन २.५ ग्रॅम (किंमत ५ हजार), सोन्याचे बदाम लॉकेट वजन १.५ ग्रॅम (किंमत तीन हजार रुपये), कानातील टॉप्स दोन जोड वजन ५ ग्रॅम (किंमत १० हजार), सोन्याचा वळा वजन १५ ग्रॅम (किंमत ३० हजार), चार ग्रॅम सोन्याचा वळा (किंमत ८ हजार), पाच ग्रॅम वजनाचा एक वळा (किंमत दहा हजार), सहा ग्रॅम वजनाचे छोटे वळे (किंमत १२ हजार), २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ५ हजार), यासह चांदीचा करंडा, निरंजन, वळे, पैंजण, जोडवी असा एकूण ४ लाख ४१ हजार २०० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने लांबविला.