कोल्हापूर :‘स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेष का’ या उपक्रमांतर्गत रंकाळा टॉवर आणि गंगावेश रोड परिसरात महापालिका, अँटी स्पीटिंग मूव्हमेंट अर्थात थुंकीमुक्त कोल्हापूरतर्फे स्वच्छतेसंबंधी जनजागृती करण्यात आली. यासाठी रॅलीही झाली. यावेळी ‘आपलं कोल्हापूर, थुंकी मुक्त कोल्हापूर’, ‘थुंकीचंद गो बॅक’, ‘आपलं कोल्हापूर, स्वच्छ कोल्हापूर’, ‘आपलं कोल्हापूर, प्लास्टिक मुक्त कोल्हापूर’ यांसारख्या घोषणा देण्यात आल्या.
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेसंबंधी जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. ऐतिहासिक रंकाळा तलाव, टॉवर परिसरात उघड्यावर कचरा न टाकणे, प्लास्टिक बंदीबाबत संदेश देणारे पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली.
यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, हृषिकेश सरनाईक, शिवाजी शिंदे, दिलीप पाटणकर, मनोज लोट, शुभांगी पवार, महेश भोसले, स्वच्छता दूत अमित देशपांडे, दीपा शिपूरकर, सारिका बकरे, गीता हसूरकर आदी उपस्थित होते.
फोटो : २२०८२०२१-कोल- जनजागृती
कोल्हापुरातील महापालिका, अँटी स्पीटिंग मुव्हमेंट अर्थात थुंकीमुक्त कोल्हापूरतर्फे स्वच्छतेसंबंधी रविवारी जनजागृती करण्यात आली.