आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 03 : प्रलंबित प्रश्नाबाबात वारवार चर्चा करून, निवेदन देवून सुध्दा प्रशासनाच्यावतीने कोणतीच दखल घेतली जात नसल्याच्या निषेर्धार्थ महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेच्यावतीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुधवारी पहिल्या टप्यांमध्ये विभागीय कार्यशाळा येथे काळा फिती लावून काम करण्यात आले. ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळेतील कर्मचारयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कामगार सेनेच्यावतीने प्रशासना सोबत वारंवार निवेदन, चर्चा करून सुध्दा त्यांची कोणतीच दखल घेतली गेली नाही. या निषेर्धाथे कामगार सेनेच्यावतीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज, बुधवारी विभागीय कार्यशाळा येथे कामगारांनी काळ््या फिती लावून काम केले. आंदोलनात सेनेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कदम, सचिव सी.बी.इचलकरंजी, सचिन साळोखे, युवराज पाटील, विजय पोवार, राजू कदम, राज चावरे, प्रमोद सुतार, जावेद सय्यद,मंदार जाधव, प्रविण पाटील, ज्ञानेश्वर राठोड, अशोक काळे, तात्या पाटील, सुनिल जाधव, नितीन माने, शुभांगी आडारी, मनोरमा हंकारे, प्रतिमा घाटगे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. असे होणार आंदोलन....गुरुवार दि.४ रोजी दुपारी साडेबारा व साडेचार वाजता विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारा समोर धरणे आंदोलन, शुक्रवारी दुपारी विभागीय कार्यशाळा ते मध्यवर्ती कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रमुख मागण्या - खात्याअंतर्गत बढती परीक्षामध्ये पास झालेल्या कर्मचार्यांना ज्या त्या विभागात काम द्या- महिलांसाठी स्वतंत्र विश्राम गृह करण्यात यावे- कार्यशाळेत लागणे स्पेअर पार्ट वेळेत द्यावेत- इचलकरंजी येथील जखमी कर्मचार्यास कार्यालयात काम द्यावेसेनेच्यावतीने प्रलंबित मागण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुध्दा अधिकारयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल.के.एन.पाटील, कार्याध्य महाराष्ट्र एस.टी.कामगार सेना
प्रलंबित मागण्यासाठी काळ््या फिती लावून काम
By admin | Published: May 03, 2017 4:19 PM