शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
2
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
3
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
4
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
5
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
6
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
7
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
8
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
9
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
11
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
13
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
14
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
15
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
16
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
17
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
18
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
19
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
20
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

Kolhapur: तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By विश्वास पाटील | Published: June 20, 2024 5:53 PM

कोल्हापूर : परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड-हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी-भेडशी ते राज्य हद्द रस्ता तिलारी घाट जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी अवजड वाहतुकीसाठी ...

कोल्हापूर : परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड-हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी-भेडशी ते राज्य हद्द रस्ता तिलारी घाट जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी अवजड वाहतुकीसाठी ३१ ऑक्टोबर अखेर बंद करण्याचे आदेश गुरुवारी दिले. वाहतूक सुरक्षा उपाययोजनेनुसार हा निर्णय घेण्यात आला.चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटात पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्याने बऱ्याच ठिकाणी रोडच्या बाजूचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. घाटातून एसटी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे बसचा एखादा अपघात होऊन अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.चंदगड पोलिस ठाणे हद्दीतून बेळगाव, शिनोळी, पाटणे फाटा, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, हेरे, मोटणवाडी, तिलारी नगर या मार्गावरून येणारी वाहतूक तिलारी घाटातून होते. घाटातील तीव्र चढ-उतारामुळे रस्त्यांच्या वळणावर वाहनांचा टर्न बसत नाही. तीव्र वळणावर वाहन अडकून राहते व वाहन काढण्यासाठी क्रेन घेऊन जाणे सुध्दा अवघड होते. बेळगाव, कर्नाटक येथून गुगल मॅपवर गोव्याला जाणारा जवळचा रस्ता तिलारी घाटातून दाखवतो. त्यामुळे वाहनचालक या घाटातून प्रवास करतात.परंतु, घाटाचा अंदाज चालकाला येत नाही. गुगल मॅपवरून परराज्यातून येणाऱ्या अवजड वाहनांवरील चालक हे या घाटाचा अंदाज नसतानाही अवजड वाहने घेऊन जाण्याचे धाडस करतात. त्यामुळे अपघाताच्या घटना व वाहने घाटात अडकून राहण्याच्या घटना घडतात. त्यामुळे मोटारसायकल व इतर चारचाकी वाहनांच्या वाहतुकीस अडथळा होतो.

पर्यायी मार्ग

  • तिलारी घाटातून होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आंबोली घाट तसेच कर्नाटक राज्यातील चोर्ला घाट असे दोन पर्यायी मार्ग आहेत. संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा-आंबोली ते बांदा हा महामार्ग क्रमांक ५४८ एच या महामार्गाचे काम सुरू आहे.
  • उत्तुर-आजरा-आंबोली मार्गे सावंतवाडी ते गोवा अशी वाहतूक देखील या मार्गावरून होऊ शकते. तरी पर्यायी महामार्गावरून अवजड वाहतुक वळविण्यास हरकत नाही.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसroad transportरस्ते वाहतूक