शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

‘तिलारी’च्या खर्चात ५० पट वाढ

By admin | Published: June 26, 2017 12:57 AM

‘तिलारी’च्या खर्चात ५० पट वाढ

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्रकल्प मुदतीत पूर्ण न झाल्याने तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाचा खर्च तब्बल ५० पट वाढला आहे. या प्रकल्पास १९७८-७९ च्या दरसूचीवर आधारित ४५ कोटी रुपयांस शासनाने मूळ मान्यता दिली होती. त्यात आता वाढ होऊन परवाच्या २१ जूनला जलसंपदा विभागानेच २४९६ कोटी ७८ लाखांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी दिली. आता हा प्रकल्प २०१८-१९ पर्यंत पूर्ण करण्याचा नवा वायदा शासनाने दिला आहे.तिलारी नदीवरील तिलारीवाडी (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे बांधण्यात आलेला महाराष्ट्र व गोवा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतो. प्रकल्पांतर्गत तिलारी नदीवर सिंधुदुर्ग जिल्ह्णातील तिलारीवाडी गावच्या वरच्या बाजूस धरण बांधून डाव्या बाजूला एक कालवा (डावा तीर कालवा) काढण्यात आला आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता ४६२ कोटी १७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रकल्पामुळे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील ६ हजार ६७६ हेक्टर क्षेत्र व गोव्यातील डिचोली, पेडणे व बारदेश तालुक्यातील १४ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.या प्रकल्पास १९७८-७९ मध्ये ४५ कोटी २० लाख इतक्या किमतीस मंजुरी दिली होती. त्यात पुढे १९९३-९४ च्या दरसूचीवर ४८८ कोटीस प्रथम सुधारित मंजुरी दिली. त्यानंतर १९९९-२००० मध्ये ९५२ कोटी ५४ लाखास दुसरी सुधारित तर २००५-०६ मध्ये १३९० कोटी तिसऱ्यांदा वाढीव मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्राच्या हिश्याची रक्कम ९८९ कोटी ५९ लाख तर गोव्याची ४०० कोटी ४५ लाख इतकी आहे. आता हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून पूर्ण करण्याचे नियोजन आहे.तिसऱ्यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर दरसूचीत वाढ झाल्याने,भूसंपादन खर्चात वाढ, प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये बदल व प्रकल्प अहवालातील अपुऱ्या तरतुदी यामुळे प्रकल्प किमतीत वाढ झाल्याचे शासन म्हणते; परंतु ३९ वर्षांपूर्वी पहिली मंजुरी दिलेल्या या प्रकल्पात अजून किती बदल केले जाणार आणि अपुऱ्या तरतुदीमुळे तो अर्धवट राहणार हेच न उलगडणारे कोडे आहे. वाढीव सुधारित मान्यतेनुसार २०१३-१४ च्या दरसूचीवर(म्हणजे त्यालाही आता तीन वर्षे होत आली) आधारित महाराष्ट्राच्या वाट्याला १६६७ कोटी (प्रत्यक्ष कामावर १३९५ कोटी) तर गोवा राज्यातील कामांकरिता ८२९ कोटी इतका खर्च होणार आहे. महत्त्वाचे बदलया प्रकल्पातील वितरण व्यवस्थेची कामे बंद नलिकेद्वारे करण्यात येणार आहेत.अतिरिक्त आर्थिक दायित्व निर्माण होईल अशा नवीन घटकांचा प्रकल्पात समावेश नकोछोटे लाभक्षेत्र निश्चित करून हाफ राऊंड सिमेंट शेतचाऱ्यांचा पथदर्शी कार्यक्रम राबवानिर्मित सिंचन क्षेत्र व प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र यामध्ये तफावत आहे ती कमी करण्यासाठी प्रयत्नकराकालव्याची व वितरण प्रणालीची कामे प्राधान्याने करासुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे प्रकल्पामध्ये झालेल्या गैरव्यवहारास मंजुरी असे नव्हे.