शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

... तोपर्यंत विकास अशक्य--

By admin | Published: October 09, 2015 12:18 AM

आपले शहर स्मार्ट होण्यासाठी कोल्हापूरचा अजेंडा

कोल्हापूर महानगरपालिकेसमोर दोन महत्त्वाच्या अडचणी आहेत. महापालिका बदनाम झाली आहे किंवा केली आहे. सततच्या बातम्या, ‘ढपला’ पाडणे, वगैरे शब्दप्रयोग मीडियातून वापरले जातात. शिवाय नागरिकांचा अनुभव, महानगरपालिकेचे रस्ते, स्वच्छता, शाळा, इत्यादी कामे पाहून हा ग्रह झाला आहे. याचे नगरसेवकांना व प्रशासनाला काही वाईट वाटते का? हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारावा. जोपर्यंत लोक ‘स्मार्ट’ होत नाहीत, तोपर्यंत शहराचा संपूर्ण विकास होणार नाही.शहराचा विकास महापालिका व प्रशासनाच्या मार्गानेच होऊ शकतो. कोल्हापूर महानगरपालिकेसमोर दोन महत्त्वाच्या अडचणी आहेत. महापालिका बदनाम झाली आहे किंवा केली आहे. सततच्या बातम्या, ‘ढपला’ पाडणे, वगैरे शब्दप्रयोग मीडियातून वापरले जातात. शिवाय नागरिकांचा अनुभव, महानगरपालिकेची रस्ते, स्वच्छता, शाळा, इत्यादी कामे पाहून हा ग्रह झाला आहे. याचे नगरसेवकांना व प्रशासनाला काही वाईट वाटते का? हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारावा. जोपर्यंत लोक ‘स्मार्ट’ होत नाहीत, तोपर्यंत शहराचा संपूर्ण विकास होणार नाही.केंद्र सरकारने स्मार्ट शहरांसाठी कल्पना मांडली, त्यात कोल्हापूरचा समावेश नाही. माझ्या मते हे बरेच झाले. कारण या शहराच्या विकासासाठी प्रचंड पैसा येईल, सरकारी पद्धतीने त्याचा वापरही होईल, त्यात सर्वांत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नागरिकांचा फारसा सहभाग असणार नाही. त्यासाठी ‘स्मार्ट’ नागरिकत्व आहे. त्याची प्रक्रिया आतापासून सुरू करावी लागेल. ‘स्मार्ट नागरिक’ म्हणजे सुजाण नागरिक; परंतु जास्त कृतिशील असणारे. आपण अनेक दिन साजरे करतो ते तेवढ्यापुरतेच असतात. स्वच्छता अभियान सुरू झाले एका दिवसापुरते. फार वर्षांपासून गांधी जयंती, संत गाडगे महाराज जयंतीला हा प्रयोग केला जात असे. त्याचा काय उपयोग झाला? कारण स्वच्छता ही सवय पाहिजे, दृष्टिकोन असावा, दिवस साजरा करणे नाही, त्याची सुरुवात लहानपणापासून, स्वत:पासून करावी लागते. तशी आपणाला सर्वांना स्वच्छतेची आवड आहे. घरे स्वच्छ ठेवतो, अंगण स्वच्छ ठेवतो, कचरा रस्त्यांवर किंवा दुसऱ्याच्या दारात टाकतो. आपण सार्वजनिकदृष्ट्या अस्वच्छ आहोत, याचा प्रत्यय जागोजागी येतो. सार्वजनिक नीतीमत्तेपासून खूप लांब आहोत.नागरिकांनी आता इनबॉक्सच्या बाहेर जाऊन सकारात्मक विचार करावा. काही वाईट असतील; परंतु सर्वच वाईट नाहीत. या भावनेने चांगल्यास प्रोत्साहन व वाईटावर अंकुश ठेवावा. महापालिकेचे अर्थशास्त्र, आॅक्ट्रॉय बंद झाला. ते सर्वांत मोठे उत्पन्न होते. एलबीटीसुद्धा बंद. इतर करवाढीला नागरिकांचा फारसा पाठिंबा मिळत नाही. केएमटी तोट्यात आहे. पैसा आणावयाचा कोठून? फक्त हे पाहिजे, ते पाहिजे, असे झाले पाहिजे, असे म्हणून काही उपयोग नाही. राज्य शासनाकडून पैसा मिळतो; परंतु तो नेहमी राजकारणात अडकलेला असतो. केंद्राची इच्छा राज्यांनी आपल्यावर अवलंबून राहावे. राज्याला वाटते स्थानिक लोकशाही संस्थांनी आपल्यावर अवलंबून राहावे. मग, त्यांना वाकविता येते. यामुळे स्थानिक स्वराज्य या कल्पनेलाच हरताळ फासला जातो. याची जाण नागरिकांनी ठेवावी. अशा स्थितीत महापालिकेला-नगरसेवकांना स्वत:चे उत्पन्नाचे मार्ग शोधावे लागतील. खर्च होणारा प्रत्येक निधी त्याच कारणासाठी, तसेच कार्यक्षमतेने खर्च होईल, याची काळजी घ्यावी. उत्पन्नाचे व विकासाचे नवे मार्ग शोधावे लागतील. (पूर्वार्ध)स्वच्छता ही सवय पाहिजे, दृष्टिकोन असावा, दिवस साजरा करणे नाही, त्याची सुरुवात लहानपणापासून, स्वत:पासून करावी लागते. तशी आपणाला सर्वांना स्वच्छतेची आवड आहे. घरे स्वच्छ ठेवतो, अंगण स्वच्छ ठेवतो, कचरा रस्त्यांवर किंवा दुसऱ्याच्या दारात टाकतो. आपण सार्वजनिकदृष्ट्या अस्वच्छ आहोत, याचा प्रत्यय जागोजागी येतो. सार्वजनिक नीतीमत्तेपासून खूप लांब आहोत.राज्य शासनाकडून पैसा मिळतो; परंतु तो नेहमी राजकारणात अडकलेला असतो. केंद्राची इच्छा राज्यांनी आपल्यावर अवलंबून राहावे. राज्याला वाटते स्थानिक लोकशाही संस्थांनी आपल्यावर अवलंबून राहावे. मग त्यांना वाकविता येते. यामुळे स्थानिक स्वराज्य या कल्पनेलाच हरताळ फासला जातो. याची जाण नागरिकांनी ठेवावी.01 आहे त्या कररचनेत फेररचना करून उत्पन्न वाढविता येते. बरेच कर अनादी काळापासून त्याच पद्धतीने लादले जातात. येथे येणाऱ्या आयुक्तांना शहराच्या विकासाशी फारसे देणे-घेणे सहसा नसेल आणि असले तरी त्यांना नगरसेवकांचा विविध कारणासाठी; परंतु आहे त्या मार्गाचा आधार घेऊन विरोध केला जातो. काही आयुक्तांनी आपल्या शहरामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत, हेही विसरता येत नाही. काहींनी स्वच्छ कारभार करून वेगळ्या भूमिकेने काम केले. त्यांना आम्ही टिकू दिले नाही. हे बंद झाले पाहिजे.02 खर्च करताना आता जुन्या कसोट्या बदलल्या पाहिजेत. कोणत्याही कामासाठी टेंडर काढले की ठरावीक लोकच ते घेतात. शिवाय ‘मंजूर’ करून घ्याला काही द्यावे लागेल, ही भावना असल्यामुळे तसेच पुढे पैसे लगेच मिळणार नाहीत, या अनुभवामुळे मुळातच टेंडर वाढवून भरण्यात येते. त्यामुळे योजनेचा खर्च वाढतो. कामात घट होते. तसेच झालेले काम कमी, हलक्या दर्जाचे होते. हे आता थांबले पाहिजे. त्यासाठी कारभार पारदर्शी पाहिजे. तसाच त्यावर नियंत्रण, अंकुश ठेवावा लागेल. 03 नगरसेवक या शब्दाचा अर्थ पूर्ण नगराचा असा होता. त्यासाठी विविध वॉर्डांतून माणसे निवडून दिली जातात. परंतु, त्यांचा व आपला सर्वांचा समज आहे की, तो एका वॉर्डमधून त्या वॉर्डाचे काम करण्यासाठी निवडून आलेला आहे. मग तो फक्त आपल्या वॉर्डाची काळजी घेतो. काही वॉर्डांतील ज्या एका गटाने त्यांना निवडून दिले, त्यांच्यासाठीच काम करतो. मग पूर्ण शहराचा विकास कसा होणार? यापुढे आपण शहर विकासासाठी निवडून आलो ही भावना असावी व जेथे गरज, तेथे पैसा खर्च करावा. प्रत्यक्षात उपनगरे पसरली, त्याप्रमाणे सोयींची गरज आहे; परंतु असे होत नाही.04 शहर वाढले की, त्याची महापालिका होते. त्यात त्यांनी स्वत:चे उत्पन्नाचे मार्ग शोधावे हे अभिप्रेत आहे. मात्र, त्यासाठी आपण फारसा प्रयत्न करीत नाही. कर उत्पन्न वाढविणे, त्यासाठी कर वाढविणे हा एकमेव मार्ग आपणाला माहिती आहे. कायम उत्पन्नाचे मार्ग शोधले पाहिजेत. कायम उत्पन्न देणाऱ्या उद्योगात महापालिकेच्या मर्यादेत गुंतवणूक केली पाहिजे. यालाच मी ‘सिंगापूर पॅटर्न’ म्हणतो. तिथे अनेक सुविधांसाठी बांधकामे, फूड मॉल, घरबांधणीसाठीसुद्धा वॉर्डातर्फे गुंतवणूक केली जाते.