शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
4
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
5
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
6
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
7
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
8
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
9
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
10
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
11
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
12
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
13
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
14
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
15
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
16
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
17
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
18
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
19
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
20
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 

वेळ गेली, महाडिकांचा प्रचार नाहीच;सतेज पाटील यांनी ए. वाय. पाटील यांना सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:56 AM

कोल्हापूर : ‘जिल्ह्णातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस संपविण्याचा विडा उचलणाऱ्या महाडिक कुटुंबीयांना सहकार्य कसे करायचे? असा सवाल करीत आता वेळ ...

कोल्हापूर : ‘जिल्ह्णातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस संपविण्याचा विडा उचलणाऱ्या महाडिक कुटुंबीयांना सहकार्य कसे करायचे? असा सवाल करीत आता वेळ निघून गेली आहे. मी तुमच्यासोबत नाहीच,’ अशा शब्दांत कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मनधरणीसाठी आलेले राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासमोर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी गेल्या पाच वर्षांतील महाडिक यांच्या भूमिकेचा पाढाच वाचला.आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा आज, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उद्या, मंगळवारी होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी ए. वाय. पाटील हे पाटील यांना निमंत्रण देण्यासाठी रविवारी गेले होते. जिल्हाध्यक्ष पाटील व कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी सकाळी साडेदहा वाजता लक्षतीर्थ वसाहत येथे आमदार पाटील यांची भेट घेतली. राहुल गांधी व शरद पवार यांनी हातात हात घालून देशात परिवर्तनासाठी कंबर कसली असताना आपण गल्लीतील भांडण दिल्लीत नेऊ नका. महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याबरोबरच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मेळाव्यास उपस्थित राहावे, अशी विनंती ए. वाय. पाटील यांनी केली. त्यावर सतेज पाटील म्हणाले, आपण येथेपर्यंत आल्याबद्दल आभार मानतो; पण माझ्या आठ प्रश्नांची उत्तरे द्या. मग मी काय करावे ते सांगा. मागील लोकसभा निवडणुकीपासून महाडिक यांनी दोन्ही कॉँग्रेसना कोणत्या निवडणुकीत मदत केली? उलट जिल्ह्णातून कॉँग्रेस, राष्टÑवादी संपविण्याचा विडा उचलणाऱ्यांना मदत कशी करायची?आम्हाला जमेत धरूच नका, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी ‘ए. वाय.’ यांचा प्रस्ताव धुडकावला.पक्षनिष्ठेपुढे अपमानाचा विसरमहापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा मेघा पाटील यांचा अनपेक्षितपणे पराभव झाला. यामागे कोण कोण होते, हे जिल्ह्णाला माहीत आहे, तरीही पक्षनिष्ठेपुढे झालेला अपमान विसरून लोकसभेच्या प्रचारात सक्रिय कसे झाला? यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.पवारसाहेबांच्या बैठकीला बोलावूच नकाशरद पवार यांच्या बैठकीसाठी बोलावूच नका आणि मीयेणारही नाही. ते ज्येष्ठ नेतेआहेत, त्यांच्यासमोरकाहीतरी वेगळे बोलणेयोग्य होणार नाही. त्यांची भेटपुणे किंवा मुंबईत घेतो, असेही आमदार पाटील यांनी सांगितल्याचे समजते.फुकटच्या आॅक्सिजनचे आता महत्त्व कळेलवातावरणातील आॅक्सिजन मोफत असतो; त्यामुळे त्याचे महत्त्व माणसाला कळत नसते. त्याचे खरे महत्त्व ‘आयसीयू’तील रुग्णाला कळते. आताफुकटच्या आॅक्सिजनचेमहत्त्व कळेल, असा सूचक इशाराही सतेज पाटील यांनी यावेळी दिला.गेल्या लोकसभेला सर्व किल्मिष मनातून काढून महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय झालो; पण मदतच केली नाही, असा आरोप कसा?६ महिन्यांत विधानसभेला माझ्याच विरोधात भावाला उभे केले. येथे आघाडी धर्म कोठे गेला होता?महापालिका निवडणुकीत कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या विरोधात उघड प्रचार का केला?विधान परिषदेला दोन्ही कॉँग्रेसची उमेदवारी मला मिळाली असताना, माझ्याविरोधात काम का केले?जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत कोणाबरोबर होता?जिल्हा परिषदेत दोन्ही कॉँग्रेसची सत्ता उलथवून लावून काय मिळविले? पी. एन. पाटील यांचा मुलगा अध्यक्ष होत असताना भाजप सदस्यांच्या गाडीचे सारथ्य का केले?महापालिका स्थायी सभापती निवडीत राष्टÑवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या स्नुषांचा पराभव करण्यात कोणाचा हात होता? आशिष ढवळे कोणाचा कार्यकर्ता?हसन मुश्रीफ व आपल्यावर सुनील कदम व सत्यजित कदमांनी खालच्या पातळीवरचे आरोप केले; त्यावेळी तुम्ही कोठे होता?सदर बझार येथे मुश्रीफ यांच्या गाडीवर दगडफेक करणारे कार्यकर्ते कोणाचे? त्यांना का आवरले नाही?६ महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा भावाचे धर्मसंकट येणार नाही का?