शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

टाईम, टिफिन आणि तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:52 AM

समीर देशपांडे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक हा एका पिढीचा पाया घालत असतो. तो जितका स्वत: समृद्ध ...

समीर देशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक शिक्षक हा एका पिढीचा पाया घालत असतो. तो जितका स्वत: समृद्ध असेल, तितकाच त्याचा विद्यार्थी अधिक समृद्ध होण्याची शक्यता वृद्धिंगत होते. म्हणून केवळ शासकीय प्रशिक्षणांना उपस्थिती न लावता, तो वैयक्तिक पातळीवर आणि प्रयत्नांमधून अधिक प्रयोगशील, प्रगल्भ व्हावा, या हेतूने गेली पाच वर्षे ‘टाईम, टिफिन आणि तिकीट’ हा उपक्रम राबविला जात आहे.निवृत्त सहा. शिक्षण संचालक संपत गायकवाड आणि सध्याचे करवीर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी भुदरगड पंचायत समितीकडे कार्यरत असताना त्यांच्या डोक्यामध्ये ही विधायक संकल्पना आली. केवळ चांगली संकल्पना आहे म्हणून शांत न राहता त्यांनी ती राबविण्याचा निर्णय घेतला.प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी हा पालकांबरोबरच शिक्षकांच्या सहवासात अधिक असतो. या शाळेमध्येच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडण्यास सुरुवात होते. एकीकडे प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन प्रयोग होत असताना, त्याची अनेक प्रशिक्षणे सुरू असताना शिक्षकाने स्वत:हून आपण समृद्ध होण्यासाठीच जाणीवपूर्वक प्रयत्न करावा, हा या उपक्रमामागील हेतू आहे.शासकीय प्रशिक्षणांसाठी ‘आॅन ड्युटी’ जाता येते. तेथे जेवणाची सोय असते. गरज असेल तर येण्या-जाण्याचा खर्चही शासन करते. मात्र, या उपक्रमामध्ये ‘थ्री टी’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. शिक्षकांनी आपला स्वत:चा वेळ द्यावा ‘टाईम’, स्वत:चे जेवण आणावे ‘टिफिन’ आणि स्वत:च्या खर्चाने प्रवास करून या शिबिरास्थळी यावे ‘तिकीट’, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.पहिले शिबिर भुदरगड तालुक्यातील मठ येथे २0१४ साली घेण्यात आले. यानंतर कोल्हापूर शहरामध्ये दुसरे, तर सांगरूळ येथील जोतिर्लिंग मंदिरामध्ये तिसरे शिबिर घेण्यात आले. आता चौथे शिबिर ५ जानेवारीला करवीर तालुक्यातील गणेशवाडीजवळील सातेरी महादेव येथे घेण्यात येणार आहे.डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यापासून ते इंद्रजित देशमुख यांच्यापर्यंतच्या मान्यवरांनी या शिबिरांमध्ये शिक्षकांशी संवाद साधला आहे. हा उपक्रम इतका अनौपचारिक ठेवण्यात आला आहे, की भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती, शिक्षण विभागातील अधिकारीही या शिबिराला आवर्जुन भेट देतात.