शहरं
Join us  
Trending Stories
1
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
2
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
3
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
4
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
5
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
6
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
7
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
8
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
9
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
10
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
12
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
13
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
14
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
15
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
16
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
17
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
18
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
19
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
20
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ

आंतरराष्ट्रीय जलदिवस विशेष: कोल्हापूर जिल्ह्यातील जलसमृद्ध जलसंपत्ती वाचवण्याची आली वेळ

By संदीप आडनाईक | Updated: March 22, 2025 15:37 IST

पाण्याचा अपव्यय, प्रदूषण वेळीच न थांबवल्यास अन्यथा भीषण परिस्थिती 

संदीप आडनाईककोल्हापूर : गरज भागवण्याइतपत पुरेसे पाणी दरवर्षी पावसाच्या रूपाने मिळत असूनही जलसमृद्ध असलेल्या जिल्ह्यातील काही शहरे आणि गावांना दुर्दैवाने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाण्याचा अपव्यय, प्रदूषण वेळीच थांबवून त्याच्या जलव्यवस्थापनाची आदर्श साेय वेळीच न लावल्यास भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा जलतज्ज्ञांनी दिला आहे.पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जिल्हा असलेला कोल्हापूर सह्याद्री पर्वतरांगेचाच म्हणजेच पश्चिम घाटाचा एक भाग आहे. हा असा जिल्हा आहे की, यातील एकूण एक तालुक्यातून एक किंवा दाेन नद्या वाहतात. त्यामुळे हा जिल्हा जलसमृद्ध आहे. या जिल्ह्यात दुष्काळ अभावानेच पडताे; परंतु तरीही जेथे मुबलक पाणी आहे आणि जेथे दुर्भिक्ष आहे, अशा गावांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते; पण शास्त्रीय उपाय योजले तर ही जलसंपत्ती वाचू शकते, असे मत भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे व्यक्त केले आहे.पाण्याची वस्तुस्थिती

  • ७,७४९ चाैरस किलोमीटर : जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ
  • १९७१.१२ मिलिमीटर : जिल्ह्यात पडणारा सरासरी पाऊस
  • ५५० टीएमसी : दरवर्षी पावसापासून मिळणारे पाणी
  • ४५-५० टक्के पाणी जीवबाष्पीभवनाने पुन्हा माघारी वातावरणात फेकले जाते.
  • ४-१० टक्के पाणी जमिनीत मुरते, भूजल पुनर्भरणासाठी उपयाेगी
  • ४०-४५ टक्के पावसाचे एकूण पाणी भूपृष्ठावरून, नदी-नाल्यातून वाहून जाते.
  • २२० टीएमसी पाणी खर्चासाठी, पिण्यासाठी, उद्याेगासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध
  • १२५ टीएमसी पाणी लहान-माेठी धरणे, तलाव, शेततळी, नदीतील डाेह यांतून साठवले जाते.

वर्ष सरासरी पाऊस२०२० - १४०५२०२१ - १४७७२०२२ - १३४२२०२३ - ९८७२०२४ - १४८३

यामुळे पडतोय जलसंपत्तीवर घालाजमिनीवरचा झाड-झाडाेरा घटत चालल्याने मृदेतील आर्द्रताही कमी हाेत आहे.जमीन पडीक बनत आहे, उत्पादन क्षमता खूपच घटत आहे.पाण्याचे साठे माेठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने, ते वापरास निरुपयाेगी बनत आहेत.अनेक गावे आणि शहरातील भागाना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

हे आहेत उपाय

  • शास्त्रीय पद्धतीने जलवितरण हवे
  • जलव्यवस्थापन यंत्रणांनी जलसाठे संरक्षित ठेवावेत
  • हे जलसाठी प्रदूषित होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
  • जलसाठ्यांवर जनावरे, वाहने, कपडे धुण्यासाठी बंदी घालणे
  • कारखान्याचे पाणी जलसाठ्यात मिसळू न देणे
  • अपुऱ्या आणि कुचकामी जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्त करणे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी