कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली तिरूपती-कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा आता दि. १ एप्रिलपासून रोज सुरू होणार आहे. सध्या ही सेवा आठवड्यात एक दिवसाआड अशी सुरू आहे. रोज सेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील दर्शनासाठी तिरूपतीला जाणाऱ्या भाविक, पर्यटकांची चांगली सोय होणार आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सन २०१९ मध्ये इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा सुरू झाली. या सेवेला चांगला प्रतिसाद आहे. त्यानंतर सलग दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करत विमानसेवा सुरू राहिली. आता आठवड्यातील सर्व दिवस विमानसेवा सुरू राहणार आहे.दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तिरूपतीला जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील भाविकांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. तिरूपती-कोल्हापूर-तिरूपती मार्गावरील विमानसेवा रोज सुरू करण्याची मागणी आम्ही केली होती. त्यासाठी पाठपुरावा केला असल्याचे ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष बी. व्ही. वराडे यांनी सांगितले
तिरूपती-कोल्हापूर विमानसेवा एक एप्रिलपासून रोज, भाविक, पर्यटकांची चांगली सोय होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:46 PM