कोल्हापूर : डेंग्यूपाठोपाठ ‘स्वाइन फ्लू’ने कोल्हापूर जिल्ह्यात डोेके वर काढले आहे. गेल्या पाच दिवसांत सहाजण, तर आॅगस्टमध्ये एक अशा एकूण सातजणांचा जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. गेली आठ वर्षे नऊ महिने १५ दिवसांत १४१ जणांचा स्वाइन फ्लूने जिल्ह्यात मृत्यू झाला. सर्वाधिक म्हणजे सन २०१७ मध्ये स्वाइनच्या फ्लूच्या मृत्यूची संख्या ६३ असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.कोल्हापूर जिल्ह्यात साधारणत: सन २०१०पासून स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराला सुरुवात झाली. २०१०मध्ये पाच, २०११ ला एक, २०१२ ला १३ व त्यानंतर दोन वर्षे ही संख्या कमी झाली. त्यामुळे सुरुवातीला याकडे गांभीर्याने पाुहले नाही. पण २०१५ पासून स्वाइनने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे तब्बल ४५ जण दगावले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरुन गेली होती. त्यानंतर पुढील वर्षी ही संख्या शून्यावर आली. त्यामुळे स्वाइन फ्लू गायब झाल्याचे चित्र दिसू लागले हाते. मात्र, २०१७ ला स्वाइन फ्लूची धास्ती पुन्हा वाढली. सर्वाधिक ६३ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. या वर्षात स्वाइन फ्लूचे संशयित ६५७ आणि ३०९ जण बाधित होते. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले.यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवातीला या आजाराची तीव्रता कमी वाटत होती. मात्र, सप्टेंबर पासून दाहकता वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून पाच दिवसांत तब्बल सहाजणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.उजळाईवाडीत स्वाइन फ्लूने तरुणीचा मृत्यूउचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एका युवतीचा रविवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. वर्षा श्रीपती पोवार (वय २५) असे तिचे नाव आहे. गेली आठवडाभर तिने एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिली; मात्र अखेर तिला रविवारी मृत्यूने गाठलेच.उजळाईवाडी (ता. करवीर) येथील उजळाईदेवी हायस्कूलचे प्रयोगशाळा सहाय्यक श्रीपती पोवार (मूळ रा. वळिवडे, ता. करवीर) हे नोकरीनिमित्त उजळाईवाडी येथील विमानतळरोड परिसरात स्थायिक झाले आहेत. त्यांची मोठी मुलगी वर्षा गेले आठवडाभर स्वाइन फ्लूने आजारी होती. तिला कोल्हापूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र,उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. वर्षाच्या मृत्यूने उजळाईवाडी व वळिवडे येथील पोवार कुटुंबीय शोकाकुल झाले. वर्षाचे विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. ती स्वभावाने अत्यंत मितभाषी होती.घ्या काळजी...खोकताना तोंडावर रुमाल धरणे.दोन तासांनी हात धुणे.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.मास्क वापरणे, सकस आहार व पुरेशी झोप.लक्षणेसर्दी, खोकला, अंगदुखी, उलट्यांचा त्रास, ताप,
कोल्हापुरात ‘स्वाइन’ने वातावरण टाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 1:09 AM