शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Chhatrapati Shahu Maharaj: शाहूराजासाठी कोल्हापूर झालं १०० सेकंद स्तब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 10:38 AM

कोल्हापूर : दीनांचे कैवारी, रयतेचे राजे, पुरोगामी चळवळीचे प्रणेते, संस्थानातील जनतेला सुखी करण्यासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारा लोकराजा राजर्षी छत्रपती ...

कोल्हापूर : दीनांचे कैवारी, रयतेचे राजे, पुरोगामी चळवळीचे प्रणेते, संस्थानातील जनतेला सुखी करण्यासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी ठिक १० वाजता सारं कोल्हापूर स्तब्ध झालं. सर्व नागरिकांनी आहे त्या ठिकाणी स्तब्धता पाळत शाहूंना आदरांजली वाहली. यामुळे सकाळच्या सुमारास रस्त्यावर असलेली गजबज आज १०० सेकंद जागच्या जागी थांबली.जिल्हा प्रशासनाच्यावतीने शाहू समाधी स्थळ येथे शाहू छत्रपती, विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी स्तब्ध उभे राहून अभिवादन केले. तर, नागरिकांनी हातातील सर्व कामे सोडून १० च्या आधीच सर्व तयारी केली होती. यानंतर सर्वांनी आपापल्या कार्यालय, दुकानासमोर शाहूंना आदरांजली वाहली. शाहू महाराजांच्या जागराने अवघे कोल्हापूर शाहूमय झाले आहे.राजर्षी शाहू महाराजांनी अवघ्या २८ वर्षांच्या राज्य कारकिर्दीत डोंगराएवढे काम करून कोल्हापूरला विकासाचे रोल मॉडेल करण्याच्यादृष्टीने पावले उचलली. धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या या दूरदृष्टीची फळे आजही कोल्हापूर चाखत आहे. या लोकराजाचा मृत्यू ६ मे १९२२ रोजी झाला. या घटनेला शुक्रवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २२ मे पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कोल्हापुरात फक्त शाहूंचा जागरशाहू कृतज्ञता पर्व अंतर्गत १८ एप्रिलपासून जिल्ह्यात शाहू महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा जागर करणारे उपक्रम घेतले जात असून, महाराजांनी स्थापन केलेली ऐतिहासिक बांधणीची शाहू मिल २० वर्षांनी सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहे. शाहूकालीन छायाचित्र, कलाकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन, गुजरी सुवर्णजत्रा, १०० व्याख्याने असे उपक्रम झाले आहेत. तर पुढील नियोजनात मिरची मसाला जत्रा, कापड जत्रा, कुस्त्यांचे मैदान असे अनेकविध कार्यक्रम होणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती