शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कोल्हापुरातील सबजेलच्या भिंतीवर 'इलेक्ट्रिक फेन्सिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 3:51 PM

कारागृहात सध्या १४० कैदी

कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलच्या भिंतीवरून उडी टाकून कैदी पळून जाऊ नयेत यासाठी सुरक्षा भिंतीवर तारांचे कुंपण लावले असून, त्यात विद्युत प्रवाह सोडला आहे. इलेक्ट्रिक फेन्सिंगमुळे कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाल्याची माहिती अधीक्षक सचिन साळवे यांनी दिली.ऑक्टोबर २०२३ मध्ये बिंदू चौक सबजेलच्या सुरक्षा भिंतीवरून उडी टाकून धनराज कुमार या परप्रांतीय कैद्याने पलायन केले होते. पळालेला कैदी काही तासांत पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी कारागृहाच्या सुरक्षा भिंतीवर इलेक्ट्रिक फेन्सिंग लावण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाला पाठवला होता.त्यानुसार फेन्सिंगला मंजुरी मिळून संपूर्ण सुरक्षा भिंतीवर तारांचे कुंपण लावण्यात आले. त्यात उच्चदाब विद्युत प्रवाह सोडण्यात आला आहे. एखाद्या कैद्याने भिंतीवरून जाण्याचा प्रयत्न केल्यास तारांचा स्पर्श होताच तो विजेच्या धक्क्याने फेकला जाईल, तसेच अलार्म वाजून सुरक्षा रक्षक सतर्क होतील, अशी माहिती कारागृह अधीक्षक साळवे यांनी दिली.कारागृहात सध्या १४० कैदीसबजेलमध्ये सध्या १४० कैदी आहेत. यात आठ महिला कैद्यांचा समावेश आहे. जेलमधील सर्व बरॅक आणि परिसरात ४० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. कैद्यांसाठी न्यायालयातील सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध आहे.

बुधवारी नेत्र तपासणी शिबिरकैद्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सचिव आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (२४) शिबिराचे उद्घाटन होणार आहे.रिल्स रोखण्यासाठी उपाययोजनाजामीन मंजूर झाल्यानंतर कारागृहातून बाहेर पडणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे मित्रांकडून मोबाइलवर शूटिंग घेतले जाते. जेलच्या प्रमुख दरवाजातून बाहेर येणारा गुन्हेगार आणि त्याच्या स्वागताचे रिल्स सोशल मीडियात व्हायरल केले जातात. असे प्रकार रोखण्यासाठी जेलबाहेर शूटिंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती अधीक्षक साळवे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग