शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘लोकमत’चा आज तपपूर्ती वर्धापनदिन..

By admin | Published: August 20, 2016 12:54 AM

स्नेहमेळाव्याचे आयोजन : धैर्यप्रसाद हॉलमध्ये होणार कार्यक्रम

कोल्हापूर : वाचकांचा विश्वास आणि पाठबळावर कोल्हापूरमध्ये ‘लोकमत’ आघाडीवर आहे. कोल्हापूरच्या प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार होऊन जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत जागल्याची भूमिका बजाविणाऱ्या ‘लोकमत’चा आज, शनिवारी बारावा वर्धापनदिन सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त येथील ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाचक, हितचिंतक, जाहिरातदार व विक्रेत्यांचा स्नेहमेळावा होणार आहे.या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन महसूल आणि सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते, तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक व युवराज छत्रपती संभाजीराजे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्तच्या विशेषांकाचा विषय ‘कोल्हापुरी उद्योग’ असा आहे. वर्धापनदिनानिमित्तचा हा विशेषांक सकाळी साडेनऊ वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण केला जाणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने वाचकांचा विश्वास आणि पाठबळावर राज्यासह कोल्हापूरमध्ये आघाडीवर आहे. ‘लोकमत’ने ‘आता बस्स’च्या माध्यमातून हद्दवाढ, उद्योग-व्यापार, अंबाबाई मंदिर, चित्रनगरी, वाहतुकीची समस्या, थेट पाईपलाईन, आदी प्रश्न लोकप्रतिनिधी व शासनासमोर मांडले; तसेच वाचक, नागरिकांच्या महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तसेच विविध शासकीय कार्यालयांत त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी ‘लोकमत हेल्पलाईन’द्वारे पाठपुरावा केला. ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमातून शहरातील विविध प्रभागांतील अडचणी मांडल्या. त्यामुळे वर्षानुवर्षांच्या अडचणी, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. ‘लोकमत इनिशिएटिव्ह’ अंतर्गत सामाजिक उपक्रमांना बळ दिले आहे. बातम्यांसह ‘सखी मंच’, ‘युवा मंच’, ‘बाल विकास मंच’च्या माध्यमांतून ‘लोकमत’ शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवितो. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चा रोजचा अंक व विविध पुरवण्यांमधून वाचकांना सकस, उत्तम ज्ञान आणि माहिती देण्याचा प्रयत्न राहिला आहे. समाजातील जे चुकीचे आहे, त्यावर प्रहार करतानाच जे चांगले आहे त्याला आवर्जून बळ देण्याची भूमिका ‘लोकमत’ सक्षमपणे बजावीत आहे. त्यामुळे वाचकांचा ‘लोकमत’ला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद व भक्कम पाठबळ मिळत आहे. त्याच्या बळावरच ‘लोकमत’ हा तपपूर्ती वर्धापनदिन सोहळा साजरा करीत आहे. त्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘लोकमत’च्या वाटचालीस बळ द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) विशेषांकाचेउत्स्फूर्त स्वागतयावर्षी तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत’तर्फे ‘कोल्हापुरी उद्योग’ हा विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. त्यात कोल्हापूरच्या उद्योगविश्वाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेण्यात आला आहे. हा विशेषांक गुरुवारपासून वाचकांच्या भेटीला आला असून, त्याचे वाचकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे.४वेळ : आज, शनिवारी, सायंकाळी ५ ते रात्री ८.३०. ४स्थळ : धैर्यप्रसाद हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर.