शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

‘अन्नपूर्णा’ कारखान्याचे आज भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:37 AM

लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : केनवडे (ता. कागल) येथे श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॉगरी या साखर कारखान्याच्या उभारणीचे भूमिपूजन आज, सोमवारी प. पू. काडसिद्धेश्वर महाराज व परमाधिकार राजीवजी महाराज या दोन महनीय व्यक्तींच्या हस्ते होत आहे. या माध्यमातून कागल तालुक्यात पाचव्या साखर कारखान्याची उभारणी होणार आहे. यामुळे सत्तेपासून दूर असणाºया संजय ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : केनवडे (ता. कागल) येथे श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॉगरी या साखर कारखान्याच्या उभारणीचे भूमिपूजन आज, सोमवारी प. पू. काडसिद्धेश्वर महाराज व परमाधिकार राजीवजी महाराज या दोन महनीय व्यक्तींच्या हस्ते होत आहे. या माध्यमातून कागल तालुक्यात पाचव्या साखर कारखान्याची उभारणी होणार आहे. यामुळे सत्तेपासून दूर असणाºया संजय घाटगे गटाच्या एकसंधतेचे ‘ध्रुवीकरण’ साधणार असून, याचा लाभ घाटगे यांना यापुढील राजकारणात होणार असल्याचेही राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे. कारखाना उभारणीच्या आरंभामुळे संजय घाटगे गटात नवचैतन्य पसरले आहे.कागल तालुक्याच्या राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित गट-तट यालाच अधिक महत्त्व आहे. त्यामुळे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी आणि गटाच्या वाढीसाठी येथील नेतेमंडळींना नेहमीच धडपड करावी लागत आहे.सध्या, तालुक्यात चार प्रमुख गट आहेत. यामध्ये समरजितसिंह घाटगे यांच्याकडे ‘शाहू’ची सत्ता, प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे ‘हमीदवाडा’ची, तर आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे ‘संताजी घोरपडे’ कारखान्याची सत्ता आहे. त्या तुलनेत माजी आमदार संजय घाटगे यांच्याकडे साखर कारखान्याची उणीव भासत आहे. त्यामुळे संजय घाटगे गटाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह सर्वांनीच आपल्या हक्काचा कारखाना व्हावा. गटातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे. आपल्या गटाच्या शेतकºयांनी पिकविलेला ऊस वाळून आणि जाळून न जाता तो वेळेत जावा या बहुद्देशाने अन्नपूर्णा कारखान्याच्या उभारणीचा घाटगे यांनी चंग बांधला आहे.विशेष म्हणजे जून महिन्यात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आडी-मल्लय्या येथे व्यापक बैठक घेऊन हा कारखाना उभारणीसाठी संजय घाटगे यांच्यावर दबाव आणला, तर घाटगे यांनीही कार्यकर्त्यांच्या मागणीलामान देऊन ते या कारखान्याच्या उभारणीचा निर्धार करीत कार्यकर्त्यांच्या जोरावर हे शिवधनुष्य उचलले आहे.घाटगे यांनी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. सध्या सहकार तत्त्वावर साखर कारखाना उभारणीला परवानगी नाही. त्यामुळेहा कारखाना खासगी स्वरूपातअसला तरी ऊस दर आणि सर्व सेवा सुविधा अन्य कारखान्यांप्रमाणेच असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका पटवून दिली असून, कार्यकर्त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.शेतकरी बांधवांना आवाहनकेनवडे (ता. कागल) येथील ‘अन्नपूर्णा शुगर’चा भूमिपूजन समारंभ आज, सोमवारी सकाळी १०.३० वाजता होत आहे. प. पू. काडसिद्धेवर स्वामीजी (कणेरी मठ), परमाधिकार परमात्मराज महाराज (आडी) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, अरुण इंगवले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शेतकरी बंधूंसह कार्यकर्त्यांनी या समारंभासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘अन्नपूर्णा’चे संस्थापक संजय घाटगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.दृष्टिक्षेपात ‘अन्नपूर्णा कारखाना’कागलमध्ये सध्या शाहू, मंडलिक व बिद्री हे सहकारी आणि सर सेनापती संताजी घोरपडे हा खासगी कारखाना कार्यरत आहे, तर अन्नपूर्णा हा खासगी स्वरूपात उभारण्यात येणार आहे.या कारखान्याची प्रतिदिन दीड हजार मे. टन ऊस गाळपाची क्षमता असली तरी प्रतिदिन दोन हजार मे. टनांपर्यंत गाळप होऊ शकते.या कारखान्याच्या उभारणीसाठी सुमारे ४० कोटी रुपयांची गरज असून, १८ ते २० कोटी रुपये शेअर्स भांडवल जमा होईल, असा अंदाज आहे.केनवडे गावच्या उत्तरेला असणाºया विस्तीर्ण डोंगर पठारावर उभारणारा हा कारखाना आॅक्टोबर २०१८ पर्यंत ऊस गाळपासाठी सज्ज होईल, असा अंदाज आहे.