नवी मुंबई : श्रीरामाच्या जन्माचा महोत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळपासून मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा, ठिकठिकाणी सामाजिक आणि खासगी संस्थांनी पहाटेपासून आयोजित कार्यक्र म, पालखी सोहळे यांच्यामुळे चैतन्य निर्माण झाले होते.पहाटेपासून काकड आरत्यांनी रामनवमीच्या उत्सवाला सुरु वात झाली. त्यानंतर दुपारी बारा वाजता शहरातील विविध मंदिरांमध्ये रामजन्माचा सोहळा पार पडला. रामनवमीनिमित्ताने ठिकठिकाणी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीच्या साईबाबांनी १९११मध्ये रामनवमीचा उत्सव साजरा करण्यास सुरु वात केली. अनेक साई मंदिरांतही कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. साईचरित ग्रंथांचे पारायणही सुरू आहे. रामनवमीनिमित्त विविध संस्थांकडून तसेच मंदिरात आठवडाभर सोहळे सुरू राहणार आहेत. काकड आरत्या, रामायणाचे पारायण, श्रीरामलीला उत्सव, प्रवचन, कीर्तन यांचा आनंद भक्तांना घेता येणार आहे. सीबीडी सेक्टर-२ मधील अलबेला हनुमान मंदिर ट्रस्टच्यावतीने रामजन्मोत्सव सोहळा साजरा केला.आर्ट आॅफ लिव्हिंग नवी मुंबईच्या वतीने वाशी येथे राम ध्यान मेडिटेशन तसेच सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी तरुणांनी अध्यात्माकडे वळावे यासाठी जनजागृती देखील करण्यात आली.बेलापूर गावात गेली १५० वर्षे रामजन्मोत्सव साजरा केला जात आहे. श्रीराम जन्मोत्सवासाठी बेलापूर गाव सजले आहे. हा उत्सव फक्त रामनवमीपुरताच मर्यादित नसतो. प्रभू रामचंद्र लंकेवर विजय मिळवून आले तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस अर्थात गुढीपाडव्याला सकाळीच श्रीरामाला अभिषेक करून या उत्सवाची सुुरु वात होते आणि सांगता होते ती थेट हनुमान जयंतीला, मारु ती जन्मोत्सवाने. पाडव्यापासून रामजन्मोत्सवापर्यंत बेलापूर गावात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. पहाटे ५ वाजता श्रीराम स्तोत्राचे पठण करून काकड आरती करण्यात आली. त्यानंतर हरिपाठ, कीर्तन आणि रामरायाचा अभिषेक झाला. दुपारी महिलांनी पाळणा गात रामजन्मोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)
श्रीपूजकांसह सामाजिक कार्यकर्त्यांवर आज गुन्हे
By admin | Published: April 16, 2016 12:47 AM