कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा नगरपालिका व तीन नगरपरिषदांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून शुक्रवारी नगरसेवकपदासाठी ४८४ (आजअखेर ६९९), तर नगराध्यक्षपदासाठी ३८ (आजअखेर ६६) अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज, शनिवारी अंतिम दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी आज उमेदवारांची झुंबड उडणार आहे. आॅफलाईन पद्धतीनेही अर्ज स्वीकारले जाणार असल्याने उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.नगरसेवकपदासाठी सर्वाधिक गडहिंग्लजमध्ये अर्ज दाखल झाले असून, कागलमध्ये ९४ अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी कागलमध्ये सर्वाधिक १४ अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे पेठवडगावमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. (प्रतिनिधी)भाजपचे नगराध्यक्षपदाचे पाच उमेदवार जाहीरनगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवसाचा अवधी असतानाच भाजपने नऊपैकी पाच नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करून इतर पक्षांवर आघाडी घेतली. ही निवडणूक सत्ताधारी भाजपने किती मनावर घेतली आहे याचेच प्रत्यंतर त्यातून आले. हे पाचही उमेदवार आता भाजपच्या चिन्हांवर लढणार असले तरी त्यापैकी एकही पूर्वाश्रमीचा भाजपचा कार्यकर्ता नाही. पक्षात आल्यानंतर त्यांना ही संधी मिळाली आहे. (पान १० वर) उमेदवार असे :इचलकरंजी : अॅड. अलका अशोक स्वामी वडगांव : डॉ. अशोक अण्णासाहेब चौगुले मलकापूर : अमोल मधुकर केसरकर गडहिंग्लज : वसंत रामचंद्र यमगेकर कुरुंदवाड : रामचंद्र भाऊ डांगेघाटगे-मंडलिक युतीकागल व मुरगूड नगरपालिकेत पालकमंत्र्यांनी समरजित घाटगे यांना पक्षाचे सर्वाधिकार दिले आहेत. तिथे घाटगे व शिवसेनेचे संपर्कनेते संजय मंडलिक यांच्यात युतीच्या वाटाघाटी सुरू आहेत. अर्ज माघारीची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत असल्याने तोपर्यंत या युतीला अंतिम रूप येऊ शकेल, असा विश्वास दोन्ही गटांनाही आहे.भाजप कुठे कुणाबरोबर..इचलकरंजीत स्थानिक सर्वपक्षीय आघाडीसोबतवडगांवला ‘जनसुराज्य’सोबतकुरुंदवाड व मलकापूरला स्वबळावरकागल-मुरगूडला सर्वाधिकार समरजित घाटगे यांना
अर्ज भरण्यासाठी आज उडणार झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 1:14 AM