कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला उद्या, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या निमित्ताने कलेचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरात याहीवर्षी नाट्य प्रयोगाची तिसरी घंटा वाजणार असल्याने यानिमित्त नाट्यरसिकांना पर्वणीच आहे. स्पर्धेतील नाटकांचे सर्व प्रयोग शाहू स्मारक भवनमध्ये रात्री साडेआठ वाजता सादर केले जाणार आहेत.या नाट्य स्पर्धेत शेतकरी मंडळ, एस़ टी़ महामंडळ, विविध शासकीय आस्थापना आणि नामांकित नाट्य संस्थांचे संघही सहभागी होणार आहेत़ पहिल्या दिवशी (दि. १७ नोव्हेंबर) स्थापत्य बांधकाम व सुव्यवस्था मंडळ (उद्योग भवन) - मी माझ्या मुलांचा हे नाटक सादर होईल. त्यानंतर ४ डिसेंबरपर्यंत विविध नाट्य कलाकृती सादर केल्या जाणार आहेत.
आजपासून ‘कलापुरा’त राज्य नाट्य स्पर्धा रंगणार
By admin | Published: November 17, 2014 12:05 AM