या दुसऱ्या फेरीमध्ये मंगळवारी विज्ञान शाखेचे २३६, वाणिज्य (इंग्रजी) १५४, वाणिज्य (मराठी) ४२, कला मराठीचे १० आणि कला इंग्रजीचा एक प्रवेश निश्चित झाला आहे. प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांनी वर्गात उपस्थित राहावे. बुधवारी मुदत संपल्यानंतर कोणताही प्रवेश केंद्रीय समितीकडून केला जाणार नाही. दरम्यान, दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाली. त्यातील दहावीची २७८६ आणि बारावीची ५३७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल आज, बुधवारी दुपारी एक वाजता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
अकरावी प्रवेशाची दुसऱ्या फेरीतील आकडेवारी
विज्ञान ४३८
वाणिज्य इंग्रजी २१७
वाणिज्य मराठी ५०
कला मराठी १२
कला इंग्रजी १
एकूण ७१८