समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नगरपंचायतीच्या स्थापनेमुळे आजºयाला मोठ्या निधीची संधी निर्माण झाली आहे. आजºयाच्या विकासासाठी नवीन दालन निर्माण झाले असताना लोकप्रतिनिधींनीही दरवेळी सोयीची भूमिका न घेता गावच्या चौफेर विकासाची भूमिका घेतल्यास आजºयाचे एक नवे रूप येत्या दहा वर्षांत दिसू शकेल.
आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या जबरदस्त पाठपुराव्यामुळे नगरपंचायतीची स्थापना झाली. याकामी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांच्या टीमचे मोठे सहकार्य लाभले. आता नगरपंचायतीच्या धोरणांनुसार शहराची प्रभाग रचना होणार आहे. त्यानंतर मतदार यादी तयार होईल आणि त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग जाहीर करेल. यासाठी किमान सहा महिने लागणार आहेत. आजºयाच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे प्रशासकपदाचा कार्यभार दिला असल्याने तेथील ग्रामविकास अधिकाºयाचे पद संपुष्टात आले आहे. नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि मुख्याधिकारी या दोन्ही भूमिकांतून निवडणुकीपर्यंत प्रशासकांना काम करावे लागणार आहे.
आता अग्निशमन दल कार्यरत होणार असल्याने आजºयातील अनेक अरूंद रस्ते अतिक्रमणामुळे अडचणीत आलेली वळणे याबाबतही विचार करावा लागणार आहे. यापुढच्या काळामध्ये आता ग्रामविकास विभागाचे नियम लागू होणार नसून नगरविकास विभागाच्या नियमानुसार कामे होणार आहेत. त्यामुळे पदाधिकाºयांबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी वाढणार आहे. पार्किंगपासून ते वाहतुकीच्या कोंडीपर्यंत अनेक प्रश्नांना नगरपंचायत उत्तर ठरू शकेल का हे आगामी काळ ठरवणार आहे.नगराध्यक्ष निवडणूक थेट नाहीनगरपालिकांसारखी नगरपंचायतीला थेट नगराध्यक्ष निवडणूक नाही. येथे नगरसेवकांतूनच बहुमताने नगराध्यक्ष निवडला जातो. आजरा नगरपंचायतीमध्ये १७ नगरसेवक राहण्याची शक्यता आहे तर दोन नगरसेवकांना स्वीकृत म्हणून घेता येणार आहेत. नगराध्यक्ष निवड थेट होणार नसल्याने नगरसेवकांमध्येच रस्सीखेच होणार आहे.हे असतील अधिकारी१) मुख्याधिकारी, २) शहर अभियंता, ३) पाणीपुरवठा अभियंता. ४) विद्युत अभियंता,५) आरोग्याधिकारी, ६) सहा. लेखाधिकारी.हे सहा अधिकारी दर तीन वर्षांनी बदलतील. याबरोबरच मोठ्या संख्येने सफाई कामगार, शिपाई, मुख्याधिकाºयांच्या गाडीवर, अग्निशमन बंबावर आणि पाणी टँकर असल्यावर त्यावर असे तीन वाहनचालक असतील.येथून निधी मिळेल१) १४ वा वित्त आयोग,२) विविध करांची आकारणी, ३) सहाय्यक अनुदान (वेतनासाठी) ४) खासदार/ आमदार निधी, ५ ) रस्ता अनुदान,६) अल्पसंख्याकअनुदान, ७) अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती अभियान, ८) दलितेत्तर अनुदान ९) जिल्हा नियोजन समितीहे असतील सभापती१) पाणीपुरवठा आणि आरोग्य समिती सभापती२) सार्वजनिक बांधकाम समिती सभापती३) शिक्षण समिती सभापती, ४) नियोजन समिती सभापती. या चार समित्यांमध्ये प्रत्येकी ५ सदस्य असतील. या चार सभापतींची मिळून स्थायी समिती तयार होते. त्याचे अध्यक्ष नगराध्यक्ष असतात.हे असतील विभाग१) बांधकाम २) पाणीपुरवठा, ३) कर,) आस्थापना, ५) आरोग्य, उद्यान ६) पुरवठा,७) अभिलेख, ८) अग्निशमन, ९) जन्म-मृत्यू दाखल विभाग