शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

करवीरनगरीचा आज शाही दसरा

By admin | Published: October 22, 2015 12:38 AM

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व तुळजाभवानी या दोन्ही देवतांची स्वतंत्र शस्त्रगृहे आहेत.

कोल्हापूर : अश्विन शुद्घ प्रतिपदेला घटस्थापनेपासून सुरू झालेला शारदीय नवरात्रौत्सवाचा अंतिम टप्पा अर्थात खंडेनवमी आणि सीमोल्लंघनाचा सोहळा. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व तुळजाभवानी या दोन्ही देवतांची स्वतंत्र शस्त्रगृहे आहेत. खंडेनवमीनिमित्त या देवतांच्या शस्त्रांची पूजा करण्यात येणार आहे. दसरा चौक येथील सीमोल्लंघनाच्या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. खंडेनवमीला शस्त्रांची किंवा घरातील धारदार साहित्यांची पूजा केली जाते. राक्षसाचा वध या महाअष्टमीच्या मुख्य दिवसानंतर आज, गुरुवारी खंडेनवमी साजरी होत आहे. यानिमित्त तुळजाभवानीच्या शस्त्रांची पूजा होईल. आज सकाळी देवीच्या पूजेनंतर साडेदहाला हा विधी होईल. यासह घरा-घरांतील लहान-मोठ्या शस्त्रांचे पूजन केले जाते. ‘विजयादशमी’ म्हणजे देवीचा विजयोत्सवाचा दिवस. सायंकाळी पाच वाजता अंबाबाई, तुळजाभवानी व गुरूमहाराजांची पालखी आपल्या लव्याजम्यानिशी दसरा चौकात पोहोचेल. येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज श्रीमंत संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, यौवराज शहाजीराजे, श्रीमंत यशस्विनीराजे, श्रीमंत राजकुमार यशराजराजे यांच्या हस्ते शमीचे पूजन होईल. आरती आणि बंदुकीच्या फैरी झाडून देवीला मानवंदना दिली जाईल. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी सहानंतर पालखी पुन्हा परतीच्या मार्गाला लागेल. अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगरमार्गे नगरवासीयांना भेटी देत रात्री आठ वाजता गरुड मंडपात येईल. रात्री साडेनऊला देवीची पुन्हा पालखी काढली जाईल. ६ वाजून २ मिनिटांनी होणार शमीपूजननवीन राजवाड्यातून छत्रपती कुटुंबीय सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी ऐतिहासिक दसरा चौकाकडे येण्यासाठी शाही मैबॅक गाडीतून निघणार आहेत. ५:५८ ते ६:०४ या दरम्यान, हे शाही शमीपूजन होणार आहे. त्यानंतर भवानी मंडपातील जुन्या राजवाड्यात छत्रपतींचा दसऱ्याचा दरबार भरणार आहे. यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. त्यानंतर ते संस्थान शिवसागर या संस्थान समाधींकडे जाणार आहेत.