कोल्हापूर : महापौर चषक स्पर्धेनिमित्त गुरुवारी शाहू स्टेडियमवर झालेल्या मैत्रिपूर्ण लढतीत ‘महापौर इलेव्हन’ संघाने ‘आयुक्त इलेव्हन’चा ३-२ असा पराभव केला, तर स्पर्धेच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत दिलबहार तालीम मंडळ (अ) ने बालगोपाल तालीम मंडळचा ५-३ असा टायब्रेकरवर पराभव केला. स्पर्धेचा अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ व प्रॅक्टिस क्लब यांच्यात आज, शुक्रवारी रंगणार आहे.महापालिकेच्या महासभेवेळी किंवा अन्य एखाद्या प्रश्नावरून नेहमी नगरसेवक पदाधिकारी अधिकाºयांना धारेवर धरतात, असे चित्र पाहण्यास मिळते. गुरुवारी मात्र, या दोन घटकांमध्ये मैत्रिपूर्ण लढत झाली. यावेळी टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस पडला. एकमेकांची खेळी पाहून अधिकारी, नगरसेवक एकमेकांना टाळ्या देऊन हसतानाचे चित्र शाहू स्टेडियमवर क्रीडा रसिकांनी अनुभवले. त्यात महापौर इलेव्हनकडून नगरसेवक सचिन पाटील यांच्या पासवर माजी नगरसेवक विनायक फाळके यांनी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर आयुक्त इलेव्हनकडून अभिजित सरनाईक यांनी महापौर इलेव्हनचा गोलरक्षक नगरसेवक संजय मोहिते हे पुढे आल्याची संधी साधत गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पुन्हा महापौर इलेव्हन संघाच्या सचिन पाटीलच्या पासवर आश्पाक आजरेकर यांनी गोल नोंदवत संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर महापौर इलेव्हनकडून हर्षवर्धन देशमुख याने गोल नोंदवत ३-१ अशी भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर अखेरच्या काही क्षणांत आयुक्त इलेव्हन संघाकडून अभिजित सरनाईकच्या पासवर संतोष पोवार यांनी गोल नोंदवत आघाडी ३-२ ने कमी केली. हीच गोलसंख्या कायम ठेवत हा सामना महापौर इलेव्हनने जिंकला. महापौर इलेव्हनकडून नगरसेवक राहुल माने, तौफिक मुल्लाणी, अभिजित चव्हाण, संतोष गायकवाड, विजयसिंह खाडे, तर आयुक्त इलेव्हनकडून स्वत: आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, हर्षजित घाटगे, संजय सरनाईक, नंदू जांभळे, चंद्रकांत पाटील यांनी चांगला खेळ केला.या सामन्यात गोल नोंदविणाºया नगरसेवकांसाठी गटनेता शारंगधर देशमुख यांनी एक ते तीन लाखांचे बजेट बक्षीस म्हणून जाहीर केले. त्यांच्या या अनोख्या बक्षिसाची चर्चा क्रीडारसिकांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून दाद दिली. योगायोगाने तिसरा गोल देशमुख यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांनीच नोंदविला. त्यामुळे रसिकांच्या हास्यात आणखीन भर पडली.तिसºया क्रमांकासाठी दिलबहार व बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात लढत झाली. सामन्याच्या ५ व्या मिनिटाला ‘बालगोपाल’कडून अभिषेक आगळे याने गोल नोंदवत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ४३ व्या मिनिटाला ‘दिलबहार’कडून निखिल जाधव याने गोल नोंदवत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. संपूर्ण वेळेत १-१ अशी बरोबरी राहिल्यानंतर पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यात ‘दिलबहार’कडून इम्युनिअल इचिबेरी, सचिन पाटील, निखिल जाधव, पवन माळी, अनिकेत तोरस्कर यांनी गोल नोंदविले. ‘बालगोपाल’कडून प्रतीक पोवार, बबलू नाईक, ऋतुराज पाटील यांना गोल नोंदवता आले, तर दिग्विजय वाडेकरचा फटका गोलरक्षकाने तटविला. त्यामुळे ५-३ अशा गोलसंख्येने हा सामना जिंकत ‘दिलबहार’ने तिसरा क्रमांक पटकावला.
पाटाकडील-प्रॅक्टिसमध्ये आज लढत : महापौर चषक फुटबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 11:55 PM
कोल्हापूर : महापौर चषक स्पर्धेनिमित्त गुरुवारी शाहू स्टेडियमवर झालेल्या मैत्रिपूर्ण लढतीत ‘महापौर इलेव्हन’ संघाने ‘आयुक्त इलेव्हन’चा ३-२ असा पराभव केला,
ठळक मुद्देतृतीय क्रमांकाच्या लढतीत ‘दिलबहार’ची ‘बालगोपाल’वर मात