शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘सनातन’वर मोर्चास परवानगीचा आज निर्णय

By admin | Published: March 22, 2015 10:38 PM

शर्मा : कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई

कोल्हापूर : ‘सनातन प्रभात’ संघटनेच्या कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलातर्फे उद्या, मंगळवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चास परवानगी दिल्यास प्रतिमोर्चा काढण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिल्याने पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूची परिस्थिती पाहून मोर्चास परवानगी द्यायची की नाही, याबाबत आज, सोमवारी निर्णय घेतला जाईल. त्यामध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी रविवारी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येशी ‘सनातन संघटने’चे लागेबांधे असल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या संघटनांकडून होत आहे. त्यामुळे याची विचारणा करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे ‘सनातन प्रभात’ संघटनेच्या शाहूपुरीतील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. परंतु, हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी देऊ नये; अन्यथा प्रतिमोर्चा काढू, असा इशारा दिला आहे. या दोन्ही संघटनांच्या भूमिकामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, अद्याप श्रमिक मुक्ती दलाकडून मोर्चास परवानगी मिळण्यासाठी पत्रव्यवहार केलेला नाही. दोन्ही संघटनांच्या भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संघटनेने मोर्चास परवानगी मिळण्यासाठी आज लेखी मागणी केली, तर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल; परंतु कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)