किसनराव मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त १४ मे रोजी प्रतिवर्षी भव्य कुस्ती मैदान भरवले जाते. विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कृषी, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक व्यक्तींचा पुरस्कार देऊनही गौरव करण्यात येतो. महिलांसाठी झिम्मा-फुगडीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तरुण वर्गासाठी विविध मैदानी तसेच प्रमुख बाजारपेठेतून किसनराव मोरे यांच्या प्रतिमेची मिरवणूक आणि त्या मिरवणुकीत अबाल-वृद्धांच्या अंगावर शहारे आणणारे कवायती प्रकार, लेझीम व हलगीचा ठेका यासह आमदार किसनराव मोरे यांच्या करारी बाण्याचे सर्व छंद जोपासण्याचा प्रयत्न यावेळी कमिटी करते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून वरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती श्री. मोरे यांनी दिली.
संयोजन कमिटीने बोलाविलेल्या बैठकीस पं. स. माजी सदस्य आर. के. मोरे, पंचायत समिती सदस्या सौ. कल्पनाताई मोरे, लोकनियुक्त सरपंच सौ. मनोज्ञा मोरे, बिद्रीचे माजी संचालक डी. एस. पाटील, प्राचार्य पी. एस. पाटील, बी. जी. बुजरे, उपसरपंच जयवंतराव पाडळकर, राजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.