कोल्हापूर : स्मार्ट सिटी, विद्यानगरी असलेले पुणे आणि कलानगरी असलेल्या कोल्हापुरातील गृहस्वप्नांची पूर्तता करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र व गोव्यामध्ये अग्रणी असलेल्या ‘लोकमत’ समूहाने ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस - २०१५’ या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या व भव्य अशा या गृहप्रदर्शनाचे आज, शनिवारी सकाळी साडेदहा वाजता हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी ‘क्रिडाई’ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव परिख, ‘क्रिडाई’ कोल्हापूरचे अध्यक्ष गिरीश रायबागे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.प्रदर्शन आज, शनिवारी व उद्या, रविवारी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. यात पुणे, कोल्हापुरातील नामांकित व आघाडीचे बांधकाम व्यावसायिक त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करणार आहेत. स्वत: ला हवे तसे आणि मनासारखे घर पाहण्यासाठी विविध परिसरांत फिरावे लागते, धावपळ होते. त्यामुळे या प्रदर्शनात ‘एकाच छताखाली’ पुण्यासह कोल्हापुरात सुरू असलेल्या आणि येऊ घातलेल्या गृहप्रकल्पांची सहजपणे माहिती मिळणार आहे. अगदी ‘वन बीएचके’पासून प्रीमियम लक्झुरिअस फ्लॅट, रो हाऊस, बंगलो, फ्लॅटपर्यंत तसेच पुणे आणि कोल्हापूर शहरांतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक मिळकतींचे प्रकार येथे पाहता येतील. कोल्हापूरकरांना त्यांच्या स्वत:च्या परिसरातील, जवळील गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे. निवडीची भरपूर संधी...प्रदर्शनात पुणे, कोल्हापुरातील बांधकाम क्षितीजावर नावाजलेले आघाडीचे बांधकाम व्यावसायिक त्यांचे प्रकल्प सादर करीत आहेत. त्यामुळे गृहइच्छुकांना निवडीची भरपूर संधी आणि खरेदीसाठी असंख्य पर्याय मिळणार आहेत. पुण्यासह कोल्हापूरच्या आजूबाजूच्या परिसरात सुरू असणाऱ्यांना गृहप्रकल्पांत गुंतवणूक करण्याची संधी कोल्हापुरातील नागरिकांना मिळणार आहे.तासाला जिंका चांदीची नाणी !हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी प्रत्येक तासाला एक ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. त्यातील भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी दिली जाणार आहेत.पुण्यातील सहभागी व्यावसायिक भंडारी असोसिएटस, द स्केपर्स इन असोसिएशन विथ जी. मित्तल अॅण्ड सन्स, कोठारी ब्रदर्स, त्रिमूर्ती ग्रुप, सुमेरू डेव्हलपर्स, सिटी कॉर्पोरेशन, श्री मंगल प्रोजेक्टस, दरोडे-जोग प्रॉपर्टीज, सिद्धिविनायक ग्रुप्स, नाईकनवरे डेव्हलपर्स, स्काय आय डेव्हलपर्स, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स, श्री व्यंकटेश बिल्डकॉन, मॅपल शेल्टर, एक्सलन्स शेल्टर, पृथ्वी एडिफाईस.
‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस’चे आज उद्घाटन
By admin | Published: February 28, 2015 12:31 AM