शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

वकिलांचे आज लाक्षणिक उपोषण

By admin | Published: August 19, 2016 12:56 AM

सर्किट बेंच : सहा जिल्ह्यांतील १७ हजार वकील सहभागी होणार

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, यासाठी आज, शुक्रवारी सहा जिल्ह्यांतील सुमारे १७ हजार वकील ज्या-त्या जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणामुळे पुन्हा एकदा थंड झालेल्या या आंदोलनाला गती मिळणार आहे.दरम्यान, कोल्हापुरातील न्यायसंकुलाच्या आवारात खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकिलांचा गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे यासाठी लढा सुरू आहे; पण अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्किट बेंचप्रश्नी सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात बार असोसिएशनच्या सत्कारावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित घटकांची या प्रश्नी पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे.दरम्यान, या सहाही जिल्ह्यांतील वकील ‘आता नाही तर कधीच नाही,’ या भावनेने पेटून उठले आहेत. प्रसंगी सनद सोडण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे. यावरून भविष्यात सर्किट बेंचचा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) (छायाचित्र पान ८ वर)