कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भागीदारी केलेल्या व आपापल्या क्षेत्रांत मानदंड ठरलेल्या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणारे ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उद्या, बुधवारी सकाळी साडेदहा वाजता होत आहे. अभिनव अशा या पुस्तकाचे प्रकाशन ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता अजय देवगण यांच्या हस्ते होत आहे. ‘लोकमत’ मीडिया गु्रपचे चेअरमन व ज्येष्ठ खासदार विजय दर्डा प्रमुख उपस्थित असतील. शिरोली औद्योगिक वसाहतीतील ‘लोकमत’च्या मुख्य कार्यालयात हा शानदार सोहळा होत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत दक्षिण महाराष्ट्राचे स्वातंत्र्यलढ्यापासून ते आजपर्यंत वेगळे योगदान आहे. या परिसराने अनेक बाबतीत महाराष्ट्राला दिशा दिली आहे. उत्तम शेती, सहकारी साखर कारखानदारी, दूध उद्योग, फौंड्री आणि सुटे भाग बनविणारी इंडस्ट्री, कला, क्रीडा, चित्रपटापासून ते लाल मातीतल्या कुस्तीपर्यंत या परिसराने देशाला व महाराष्ट्राला नेतृत्व दिले आहे. अशाच उज्ज्वल परंपरेतील काही मोजक्या प्रातिनिधिक व्यक्तींच्या जीवनकार्याचा आलेख या पुस्तकाच्या निमित्ताने समाजासमोर नव्याने मांडला जात आहे. उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर लखलखीत प्रकाश टाकण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळू शकेल. अभिनेते अजय देवगण या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात येत असल्याने त्यांच्याबद्दल तरुणाईमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यांचे ‘सिंघम रिटर्न्स..’मधील ‘आता माझी सटकली...’ही कॅचलाईन प्रत्येकाच्या जीभेवर आहे. या कॅचलाईनलाही कोल्हापूरच्या रगेलपणाचा व मातीचा वास आहे. त्याअर्थानेही कोल्हापूर व देवगण यांची ‘केमिस्ट्री’ एक आहे. हा सोहळा फक्त निमंत्रितांसाठीच राखीव आहे.प्रयोगशील, व्रतस्थ ५१ व्यक्तिमत्त्वांचा गौरवदक्षिण महाराष्ट्रातील जिद्दी, प्रयोगशील आणि व्रतस्थ अशा ५१ व्यक्तिमत्त्वांचा गौरवच या ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या बुकच्या माध्यमातून ‘लोकमत’ने केला आहे.असा असेल सोहळा‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशनवेळ : १०. ३० वाजता ४स्थळ : ‘लोकमत भवन, औद्योगिक वसाहत, शिरोली कोल्हापूर
‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’चे आज प्रकाशन
By admin | Published: November 18, 2014 10:33 PM