शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

बेसबॉल संघाची आज निवड

By admin | Published: January 07, 2015 11:42 PM

राज्यस्तरीय स्पर्धा : यजमान सांगलीसह १५ संघांची उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल

सांगली : आक्रमकपणे फटकेबाजी करीत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवून यजमान सांगली जिल्हा संघासह १५ संघांनी आज उपांत्य फेरीकडे वाटचाल केली़ अनुभवी सातारा, ठाणे व अकोला संघांना मात्र पराभवाचा जोरदार धक्का बसला़ सांगली जिल्हा बेसबॉल असोसिएशन व फिनिक्स स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या वरिष्ठ राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये या स्पर्धा सुरू आहेत. नगरसेवक शेखर माने यांनी आज स्पर्धेस सदिच्छा भेट दिली़ स्पर्धा समितीचे सचिव राजेंद्र कदम यांनी त्यांचे स्वागत केले़ सांगली पोलीस दलाचा आंतरराष्ट्रीय धावपटू अनिल ऐनापुरे याचा सत्कार करण्यात आला़ यावेळी राजेंद्र इखणकर, पुरूषोत्तम जगताप, जितेंद्र पाटील, रूक्साना मुलाणी, ज्ञानेश काळे, विजय बोरकर, किरण पवार, आर्यदीप लोंढे, सुरेश हादीमणी, मदन दाभाडे उपस्थित होते़ स्पर्धेचा आजच्या दिवसाचा अंतिम निकाल असा : पुरुष : सांगली विजयी विरुद्ध बीड (४-३), नाशिक वि. वि. अकोला (१-०), वाशिम वि. वि. औरंगाबाद (१०-२), नागपूर वि. वि. ठाणे (४-०), यवतमाळ वि. वि. मुंबई उपनगर (१-१), अमरावती वि. वि. सातारा (१-०), मुंबई शहर वि. वि. सांगली (३-३), जळगाव वि. वि. बुलडाणा (६-०), मुंबई उपनगर वि. वि. कोल्हापूर (९-०), अहमदनगर वि. वि. बुलडाणा (९-१), नागपूर वि. वि. धुळे (४-३), पुणे वि. वि. औरंगाबाद (४-०)़ महिला : पुणे वि. वि. नागपूर (११-११), कोल्हापूर वि. वि. औरंगाबाद (१-०), सोलापूर वि. वि. कोल्हापूर (२-१), नागपूर वि. वि. सांगली (७-१), सोलापूर वि. वि. औरंगाबाद (१-०), रत्नागिरी वि. वि. नागपूर (३-०), सातारा वि. वि. अमरावती (१-१), सोलापूर वि. वि. अमरावती (५-०)़ पंच म्हणून इंद्रजित नितनवार (अमरावती), जयकुमार रामटेके (नागपूर), नारायण बत्तुले (अकोला), संतोष खेंडे (सोलापूर) यांनी काम पाहिले़ खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा बेसबॉल संघ निवडण्यात येणार आहे. हा संघ गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल, असे राजेंद्र कदम यांनी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)जिल्ह्यात बेसबॉलचा ‘डबलबार’यापूर्वी जिल्ह्यात २०१३ मध्ये राज्य बेसबॉल स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या होत्या. २०१५ मध्ये जिल्ह्यास पुन्हा एकदा या स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला़ २०१६ मध्ये जिल्ह्यात राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा आयोजित करणार असल्याचे राजेंद्र कदम यांनी सांगितले.