कोल्हापूर : टोलविरोधात काढण्यात येणार्या तिसर्या महामोर्चाची तयारी व तारीख ठरविण्यासाठी बुधवार (दि.१४) दसरा चौकातील शहाजी महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्याचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने पत्रकाद्वारे केले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने शहरातील टोलसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविल्यानंतर गेली तीन महिने बंद असलेला टोल कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकतो. टोलविरोधात पुन्हा आंदोलनाचे रान उठविण्याचा निर्णय नुकत्याच टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात महामोर्चा काढण्याचे ठरले. या मोर्चाच्या तयारीसाठी मेळावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक मोठ्या ठिकाणी सभा, मेळावे घेऊन जागृती केली जाणार आहे. प्रचंड संख्येने मोर्चा काढून सरकारला कोल्हापूरकरांतर्फे टोलमुक्तीची अंतिम नोटीसच बजावण्याची आहे. यासाठी नियोजन मेळाव्यास सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहण्याची विनंती कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
टोलविरोधी महामोर्चाचे नियोजन; बुधवारी मेळावा
By admin | Published: May 10, 2014 12:22 AM