शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

तलाठी कार्यालयासमोर पेटविल्या चुली

By admin | Published: August 30, 2016 12:47 AM

दाखल्यांसाठी आंदोलन : आलासमध्ये प्रश्न न सुटल्याने रात्रीही कष्टकरी शेतमजूर, शेतकरी आंदोलकांचा ठिय्या

बुबनाळ : आलास (ता. शिरोळ) येथील गावकामगार तलाठी कार्यालयावर शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेतर्फे संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळावा, या मागणीसाठी लाभार्थ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केले. सायंकाळी हा प्रश्न सुटला नसल्यामुळे तलाठी कार्यालयासमोरच चुली मांडून स्वयंपाक करण्यात आला. यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. आलास येथील गावकामगार तलाठी कार्यालयावर शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यांना २१ हजार रुपयांचे उत्पन्न दाखले मिळावेत यासाठी वेळोवेळी तलाठी कार्यालयाकडे मागणी करूनही टाळाटाळ करीत आहेत. जे दाखले दिले आहेत, ते दाखले पूर्ण चौकशी न करता दिले आहेत. त्याचबरोबर दारिद्र्यरेषेमधील लोकांचे उत्पन्न दाखलेही वाढीव उत्पन्न करून दिले आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांवर तलाठी कार्यालयाकडून अन्याय झाला आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची फेरचौकशी करून उत्पन्नाचे दाखले मिळावेत, या मागणीसाठी सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. कार्यकर्त्यांनी तलाठी कार्यालयासमोर रात्रीच्या जेवणासाठी दगडाच्या चुली मांडून स्वयंपाक केला. आंदोलनकर्ते सर्व दाखले एका वेळीच मिळावेत यावर ठाम असून, यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात सुरेश सासने, जिनपाल कोळी, सिकंदर मुजावर, पद्मावती उपाध्ये, सुशीला उपाध्ये, लीलावती गिताजे, फुलाबाई घुणके, गुणवंती हासुरे, शानाबाई गावडे यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, नृसिंहवाडीचे मंडल अधिकारी ए. डी. पुजारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शिरोळ तालुका कष्टकरी शेतकरी मजूर संघटना यांनी संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेबाबत २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न दाखला मिळण्यासाठी आलास तलाठी यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने पात्र लाभार्थी आहेत, त्यांचे दाखले तयार केले आहेत. मुले नोकरी करतात, कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावाने शेती आहे, त्यामुळे २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न दाखले देता येत नाहीत; परंतु आंदोलनादिवशी ९० अर्ज दाखल केले आहेत. चौकशी करून पात्र असतील त्यांना १० सप्टेंबरपर्यंत दाखले देण्याची कार्यवाही करीत आहे. परंतु , आताच सगळ्यांनी दाखल्यांची मागणी केल्याने स्थानिक चौकशी केल्याशिवाय ते देता येत नाहीत. (प्रतिनिधी)आलास (ता. शिरोळ) येथे शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी सोमवारी तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.