शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

टोमॅटो दहा रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 12:41 AM

कोल्हापूर : टोमॅटोंची आवक वाढल्याने घाऊक बाजारात तीन रुपये किलोपर्यंत दर खाली आला आहे. किरकोळ बाजारात तर लालभडक टोमॅटो दहा रुपये किलो झाला आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीळ, बाजरीची मागणी वाढली असून, तीळगूळ व तिळाच्या गोळ्यांची आवकही चांगली आहे. फळांची आवक वाढत असून बोरे व द्राक्षांची रेलचेल चांगली आहे.कोल्हापूर बाजार समितीमध्ये ...

कोल्हापूर : टोमॅटोंची आवक वाढल्याने घाऊक बाजारात तीन रुपये किलोपर्यंत दर खाली आला आहे. किरकोळ बाजारात तर लालभडक टोमॅटो दहा रुपये किलो झाला आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीळ, बाजरीची मागणी वाढली असून, तीळगूळ व तिळाच्या गोळ्यांची आवकही चांगली आहे. फळांची आवक वाढत असून बोरे व द्राक्षांची रेलचेल चांगली आहे.कोल्हापूर बाजार समितीमध्ये टोमॅटोंची आवक जोरात सुरू आहे. रोज तीन हजार कॅरेट येत असल्याने दर घसरू लागले आहेत. घाऊक बाजारात तीन ते सात रुपयांपर्यंत दर असून सरासरी प्रतिकिलो पाच रुपये दर आहे. गेल्या आठवड्यापेक्षा सरासरी दरात पाच रुपये कमी झाले आहेत. ढबू मिरची, दोडक्याच्या दरांतही घसरण झाली असून कोबी, वांगी, गवार व ओल्या वाटाण्याच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. कोथिंबिरीची आवकही वाढली असून, रोज पंचवीस हजार पेंढ्या येत आहेत. घाऊक बाजारात अडीच रुपये पेंढी झाली आहे. हरभºयाच्या पेंढ्यांची आवक कमी झाल्याने दर थोडासा तेजीत आहे. मेथी, पालक, पोकळा, शेपूचे दर थोडे वाढले आहेत.मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीळगूळ, राळ, गूळ, बाजरीची आवक व मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात बाजरी २४ रुपये, तर राळ ४० रुपये किलो दर आहे. गुळाची मागणी वाढली असली तरी दर ४० रुपयांपर्यंत खाली आला आहे. तूर व हरभरा डाळींचे दर स्थिर आहेत. फळ मार्केटमध्ये माल्टा, चिकू, सफरचंद, डाळिंबांची आवक चांगली असून बोरांची आवक मात्र वाढली आहे. बाजार समितीत रोज बोरांच्या एक हजार पोत्यांची आवक सुरू आहे. द्राक्षांची आवक हळूहळू वाढू लागली असून, घाऊक बाजारात सरासरी ३० रुपये किलोपर्यंत दर आहे. ग्राहकांना अद्याप ‘सोनका’ द्राक्षांची प्रतीक्षा असल्याने मागणी फारशी दिसत नाही.साखरेचा दर वधारला!गेल्या महिनाभर साखरेचे दर हळूहळू घसरू लागले होते; पण गेल्या दोन दिवसांत घाऊक बाजारात साखरेच्या दरात थोडी वाढ होत असून, प्रतिक्विंटल ३३५० रुपये दर राहिला आहे.लसूण २५ रुपये किलोलसणाचे दरही घसरू लागले असून किरकोळ बाजारात २५ रुपये किलो दर झाला आहे. गत आठवड्यापेक्षा कांद्याच्या आवकेत ३८९३ क्विंटलनी घट झाल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. बटाट्याची आवक व दर मात्र स्थिर आहेत.