कोल्हापूर : येथील आंबेडकरी जनआंदोलन कार्यकर्ता सन्मान महापरिषद शनिवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजता दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. आंबेडकर समाजभूषण गौरव पुरस्काराचे प्रथम मानकरी म्हणून जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग दादा बिडकर (आलासकर) यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते बाबूराव पोटभरे यांच्या हस्ते बिडकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी विचारवंत डॉ. प्रा. जगन कराडे यांचे व्याख्यान होणार असून, ज्येष्ठ नेते बाबासाहेब वडगावकर अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. दरम्यान, भीमगीतांचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला असल्याचे पत्रक कार्यकर्ता सन्मान महापरिषदेचे अध्यक्ष रंगराव कामत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
उद्या आंबेडकरी कार्यकर्ता सन्मान महापरिषद
By admin | Published: May 30, 2014 1:50 AM