शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा मृत्यूचा नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
2
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
3
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
4
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
5
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
6
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
7
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
8
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
10
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
12
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
13
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
14
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
15
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
16
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
17
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
18
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
19
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
20
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

शिक्षण सहसंचालकांच्या कारभाराविरुद्ध उद्या आंदोलन

By admin | Published: July 31, 2016 12:45 AM

‘सुटा’ संघटनेच्या बैठकीत निर्णय : आंदोलनाची धार तीव्र करणार

कोल्हापूर : शिक्षण सहसंचालकांच्या नियमबाह्य, पक्षपाती व मनमानी कारभाराबाबत सुधारणा व्हावी व प्राध्यापकांचे प्रश्न मुदतबंद पद्धतीने सोडवावेत, याबाबत चर्चा होऊनसुद्धा कोणतीहीकार्यवाही झाली नाही. या विरोधात उद्या, सोमवारी (दि. १) निदर्शने करण्यात येणार आहेत. यासह शिवाजी विद्यापीठस्तरावरही काही प्रलंबित मागण्या आहेत, त्यांच्या विरोधात पुढील टप्प्यांत आंदोलन करण्याचा निर्णय, शनिवारी ‘सुटा’ संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात घेण्यात आला. न्यू कॉलेज येथे शनिवारी दुपारी झालेल्या मेळाव्यात सुटाचे अध्यक्ष प्रा. आर. डी. ढमकले, प्रा. आर. जी. कोरबू, प्रा. एम. जी. पाटील, प्रा. सुधाकर मानकर, प्रा. प्रकाश कुंभार, प्रा. अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा. आर. डी. ढमकले म्हणाले, शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे प्रलंबित मागणीसाठी शिक्षण सहसंचालक यांच्यासोबत चर्चा झाली, मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही. यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासोबत प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांबाबत व विद्यापीठाच्या शैक्षणिक कारभाराबाबत पाचवेळा चर्चा झाली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत एक-दोन अपवाद वगळता कोणत्याही प्रमुख प्रश्नी कार्यवाही झालेली नाही. ते सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने एक महिन्याची मुदत दिली आहे. याबाबत अपेक्षित कार्यवाही न झाल्यास दि. १ सप्टेंबरपासून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मेळावे घेण्यात येणार आहे. प्रा. प्रकाश कुंभार म्हणाले, संघटनेच्यावतीने नेट प्रश्नी सुप्रीम कोर्टात आपली बाजू भक्कम मांडली जाणार आहे, त्यामुळे प्राध्यापकांनी संघटनेवर विश्वास ठेवावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, संघटनेच्यावतीने अधिकृत माहिती प्रत्येकवेळी जाहीर केली जाईल. प्रा. नीलेश शेळके, प्रा. महेंद्र कदम, प्रा. डी. एन. पाटील, प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. प्रशांत पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन ४निदर्शने : सोमवार, दि. १ आॅगस्ट दुपारी ३.३० वा. ४धरणे : गुरुवार, दि. ११ आॅगस्ट, दुपारी ३ ते ६ पर्यंत ४बेमुदत उपोषण : सोमवार, दि. २२ पासून बेमुदत उपोषण प्रलंबित प्रमुख मागण्या.... ४सर्व प्राध्यापकांना आॅनलाईन वेतन मिळावे. ४नेट/सेट मुक्त प्राध्यापकांची स्थान निश्चिती विनाविलंब करावी. ४शारीरिक शिक्षण संचालकांची स्थाननिश्चिती करण्यात यावी. ४कार्यालयाचा कारभार पारदर्शक व लेखी स्वरूपाचा असावा. जिल्हास्तरीय मेळावा ४सातारा : रविवार, दि. १४ आॅगस्ट रोजी ४कोल्हापूर : बुधवार, दि. १७ आॅगस्ट रोजी ४सांगली : रविवार, दि. २१ आॅगस्ट रोजी