कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ९७ वा रविवार असून, यामध्ये सामाजिक संघटना, संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.
सायबर चौक ते एस.एस.सी बोर्ड, लक्ष्मीपुरी परिसर, स्मूशानभूमी परिसर, महावीर कॉलेज ते भगवा चौक, उड्डान पूल मेनरोड परिसर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वृक्षप्रेमी संस्थेमार्फत शहरामध्ये पाच पथके विभागून पंचगंगा नदी परिसर, बुधवार पेठ, ट्राॅफिक ऑफिस, शुक्रवार पेठ, व्हीनस कॉर्नर रोड, हरिओम नगर, सानेगुरुजी वसाहत, कळंबा येथे प्लास्टिक कचरा उठाव करून स्वच्छता मोहीम केली. तसेच जुन्या लावलेल्या झाडांची देखभाल केली. या मोहिमेमध्ये वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, सतीश कोरडे, सचिन पवार, सविता साळुंखे, तात्या गोवावाला आदी, सदस्य उपस्थित होते.
स्वरा फौंडेशनच्यावतीने रंकाळा येथे स्वच्छता करून फुलांची झाडे लावण्यात आली. स्वरा फाउंडेशन महिला अध्यक्ष सविता पंढळकर, उपाध्यक्ष पीयूष होलस्वार, डॉ. अविनाश शिंदे, आयु. शिंदे, फैजन देसाई, साक्षी गुंडगल्ली, काका पंढळकर, आदी उपस्थित होते.
चौकट
महापालिकेची यंत्रणा
दोन जेसीबी, तीन डंपर, चार आरसी गाड्या, एक ट्रॅक्टर-ट्रॉली, दाेन औषध फवारणी, १५० महापालिकेचे कर्मचारी.
फोटो : ०७०३२०२१ कोल केएमसी स्वच्छता
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविली.