शिरोळ : कोरोना पार्श्वभूमीवर संचारबंदी व निर्बंध शासन घालत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमधील बिकट परिस्थितीत हातावर पोट असलेल्या चर्मकार समाजातील गोरगरीब तसेच गटई कामगार कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संत रोहिदास विकास फाऊंडेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निशिकांत शिंदे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
--
नृसिंहवाडीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनाचे औचित्य साधून दलितबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते वस्तूंचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या परवीन पटेल होत्या. स्वागत विद्या कांबळे यांनी केले. याप्रसंगी सरपंच पार्वती कुंभार, दादेपाशा पटेल, अमोल पुजारी, तानाजी निकम, मंगल खोत, अनघा पुजारी, पूनम जाधव, कृष्णा गवंडी, अविनाश शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच रमेश मोरे यांनी आभार मानले.
--
शिरोळ बंधाऱ्यात दूषित पाणी
शिरोळ : येथील बंधाऱ्यातील पंचगंगा नदीपात्रात फेसाळयुक्त दूषित पाणी दाखल झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठची शेती नापीक बनत आहे. मोठ्या प्रमाणात पंचगंगा पात्रात इचलकरंजी शहराचे सांडपाणी थेट दाखल होत आहे. त्यामुळे यावर यावर पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.