शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

पुरग्रस्तांच्या स्थलांतरणास सर्वोच्च प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 8:04 PM

पुरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पुरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र व राज्य शासनामार्फत लागणारी सर्व ती मदत युध्दपातळीवर केली जाईल

कोल्हापूर - पुरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पुरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र व राज्य शासनामार्फत लागणारी सर्व ती मदत युध्दपातळीवर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना केली. जिल्ह्यातील पुरपरिस्थितीचा आणि सुरु असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित केलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. 

यावेळी महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर, खासदार संभाजीराजे राजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, महापौर माधवी गवंडी, आमदार सतेज पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते.

जादा बोटी प्राधान्याने देणारपुरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी 60 बोटी उपलब्ध करुन दिल्या असून आणखीन जादा बोटी प्राधान्याने दिल्या जातील, असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात उदभवलेली पुरपरिस्थिती आणि पुरग्रस्तांसाठी सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत केंद्र आणि राज्य शासन  सतर्क असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्तीश: पुरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्यावर लक्ष केंद्रीत केले असून पुरग्रस्तांसाठी आवश्यक असणारी सर्व ती मदत करण्यास प्रधान्य दिले आहे. कोल्हापूरातील पुरपरिस्थितीबाबत सातत्यपूर्ण केंद्र शासनाचा राज्य शासनाशी संपर्क असून पुराच्या पाण्याची पातळी कमी होण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आजच चर्चा केली असून त्यांनी अलमट्टीचा विसर्ग आज सायंकाळपर्यंत 5 लाख क्युसेक करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे  पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होईल.  यापुढील काळातही या दोन्ही राज्यामध्ये आवश्यक तो समन्वय ठेवून पुर परिस्थिती  नियंत्रणात आणण्यावर अधिक भर दिला जाईल.लसीकरण आणि औषध पुरवठा     पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, गोवा कोस्टलच्या बोटी बरोबरच ओडिसा, पंजाब, गुजरात, गोवा या राज्याबरोबरच देशाच्या इतर भागातूनही जादा टीम मागविल्या आहेत.  पुराने वेढा दिलेल्या गावातील पुरग्रस्तांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी हालविण्याचे निर्देश देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुरग्रस्तांना संक्रमण  शिबीरात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार लसीकरण आणि औषध पुरवठा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  घरात पाणी शिरलेल्या पुरग्रस्तांसाठी १० तसेच १५ हजार हजार रुपये, पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी ५ लाख रुपये तसेच पुरग्रस्तांना अन्नधान्याची मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

वीज, पाणी पुरवठा तत्काळ सुरु करणारपुरग्रस्तांसाठीच्या बचाव व मदत कार्यासाठी लागणाऱ्या गोष्टी विशेषत: औषधे व अन्य सामुग्री आवश्यकतेनुसार एअर लिफ्ट करण्याची शासनाने तयारी ठेवली असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गॅस, पेट्रोल, डिझेल आदी जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याबाबत उच्च पातळीवर चर्चा सुरु असून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. पुरामुळे बंद पडलेल्या जवळपास 390 पाणी पुरवठा योजना पुर ओसरताच प्राधान्याने सुरु करण्याबरोबरच जिल्ह्यातील 2 लाखावर शहरी आणि ग्रामीण वीज ग्राहकांची वीज कनेक्शन प्राधान्याने सुरु करण्याबाबत विद्युत वितरण कंपनीने उपाय योजनांसाठी टीम तयार केल्या असून त्यांना आवश्यकतेनुसार आणखीन जादा टीम उपलब्ध करुन दिल्या जातील. प्राथमिक अंदाजानुसार पुरामुळे 67984 हेक्टरवरील कृषी पिकांचे नुकसान झाले असून याबाबतही प्रशासनाने तात्काळ उपाय योजना करण्याचे त्यांनी निर्देश दिले. एकही पुरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना केली.

 पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तु, औषधोपचार उपलब्ध करुन देण्यबरोबरच जनावरांसाठी खाद्य/वैरण उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यकतेनुसार टीम तयार करण्याबरोबरच पुरग्रस्तांसाठी पाणी शुध्दीकरणाची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

तसेच शाळामध्ये स्थलांतरीत करण्यात आलेल्या पुरग्रस्तांना गहू, तांदुळ अशा जीवनावश्यक वस्तू देण्याची खबरदारी घ्यावी.  प्रारंभी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील पुरपरिस्थिती आणि सुरु असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात पुरामुळे 233 गावे बाधित झाली असून 18 गावांना पूर्णपणे पुराचा वेढा पडला आहे. जिल्ह्यात पुरामुळे 20933 बाधित कुटुंबे असून 97102 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात पुरग्रस्तांसाठी 152 संक्रमण शिबीरे असून यामध्ये 38142 लोकांची सोय केली आहे. पुरग्रस्तांच्या बचाव व मदत कार्यासाठी 60 बोटी असून 425 जवान कार्यरत आहेत. जिल्ह्यातील 3813 घरांची पुरामुळे पडझड झाली असून 79 घरे पूर्णत: पडली असून 3651 घरे अंशत: पडली आहेत तर 83 जनावरांची गोटे पडली आहेत. जिल्ह्यात पुरामुळे 107 बंधारे पाण्याखाली गेले असून एनएच 4 या राष्ट्रीय महामार्गासह 158 रस्ते पुरामुळे बंद आहेत. 390 पाणी पुरवठा योजना बंद पडल्या असून महाविरणचे 13 उपकेंद्रे व 127 गावठाण व शहरी वाहिन्या बंद पडल्या आहेत. एकूण 201032 वीज ग्राहकांची कनेक्शन बंद असून 67984 हेक्टरवरील कृषी पीकांचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाल्याचे यावेळी सांगितले.

बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता  म्हारुळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे, उपजिल्हाधिकारी  नावडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अल्वारीस यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस