टोप येथील बिरदेव जळाची यात्रा तीन वर्षांतून एकदा गुढीपाडव्याला भरते या यात्रेस संकेश्वर (ता. चिक्कोडी) तसेच कोतोली (ता. पन्हाळा) येथून दोन पालख्या येतात; परंतु या पालखीसोबत ५ लोकांनी यावे, असे सांगून यात्रा काळात कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले; तर प्रशासनाच्या नियमांचे पालन करून योग्य प्रकारे नियोजन करून कोणतेही गालबोट न लावता यात्रेतील धार्मिक विधी मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावा, असे आवाहन सरपंच रूपाली तावडे यांनी केले.
यावेळी उपसरपंच संग्राम लोहार, पोलीस पाटील महादेव सुतार, ग्रामविकास अधिकारी डी. आर. देवकाते, कृष्णात सिसाळ, कामन्ना पुजारी, सर्जेराव धनगर, विनोद देवाळकर, बिरू पुजारी, सर्जेराव सिसाळ, अमोल सिसाळ, सागर पुजारी, सुभाष पुजारी आदींसह बिरदेव भक्त उपस्थित होते.