शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार सर्व पक्षीय बैठकीत निर्णय : जनआंदोलन उभारण्याचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:40 AM

शिरोली : टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन याविषयी भूमिका मांडण्याचा निर्णय आज, शनिवारी टोप येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शिरोली : टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन याविषयी भूमिका मांडण्याचा निर्णय आज, शनिवारी टोप येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.टोपसह पाच ग्रामपंचायती व स्मॅकने एकत्रित जनहित याचिका दाखल करून कोल्हापूर शहराच्या कचऱ्याविरोधात जन आंदोलन उभा करण्याचा निर्णय टोप ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे होते.

राजीव आवळे म्हणाले, टोप गावच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये शहराचा कचरा कशासाठी? शहरातील आरक्षित जागा बिल्डरांच्या घशात गेल्या आणि आता शहराचा कचरा आमच्या दारात का? सध्या शहराचा कचरा कसबा बावड्यात टाकला जातो. तेथील लोकांचा या कचºयाला सतत विरोध आहे. या घनकचºयामुळे शहरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मग हा कचरा टोपमध्ये आल्यावर येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकणार नाही का? शिये फाटा येथील टोपच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये कचरा आला तर शिरोली एमआयडीसीमध्ये येणाºया उद्योजक व कामगारांना, शिये गावाला, टोपमधील सध्या राहत असलेल्या लोकांना याचा मोठा त्रास होणार आहे. या बैठकीला शिये जिल्हा परिषदेचे सदस्य मनीषा कुरणे, बाजीराव पाटील, संभापूरचे सरपंच प्रकाश झिरंगे, कृती समितीचे अध्यक्ष विठ्ठलपंत पाटील, उद्योजक धनाजी पाटील, आदी उपस्थित होते.राजू शेट्टी, मिणचेकर, नरके मुख्यमंत्र्यांना माहिती देणारशेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर व चंद्रदीप नरके हे दोन्ही आमदार मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास कदम यांची भेट घेऊन त्यांना कचºयाबाबत माहिती देणार आहेत.यावेळी टोपच्या सरपंच रूपाली तावडे म्हणाल्या, हा सामूहिक लढा आहे. टोपसह संभापूर, कासारवाडी, शिये, नागाव, शिरोली एमआयडीसी (स्मॅक) या सर्वांनी एकत्रितपणे येऊन हा लढा उभा करून कोल्हापूर शहराचा कचरा परतवून लावू. यासाठी सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे, तरच हा लढा यशस्वी होईल .स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, टोप येथील दगडखाणीमध्ये कोल्हापूर शहराचा कचरा आल्यावर उद्योजकांना व कामगारांना मोठा त्रास होणार आहे. भटकी कुत्री, डुकरे, जनावरे यांचा उपद्रव वाढेल. रोगराई पसरून कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. याला आमचा विरोधच राहील. या आंदोलनात स्मॅकचा सहभाग असेल.