कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत २१४ नागरिकांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून त्यापैकी ३३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १४१ जणांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या २४ तासात नवे पाच रूग्ण दाखल झाले असून त्यातील तिघेजण सीपीआरमध्ये तर दोघे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना पाॅझिटिव्ह असणाऱ्या नागरिकांना प्रामुख्याने म्युकरची लागण होत असून त्यातही मधुमेह असणाऱ्यांना याची लागण लगेच होते असे निरीक्षण आहे. आतापर्यंत ७० हून अधिक जणांवर सीपीआरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आला असून अजून ४० जण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात ४ हजार ४५ जणांना लस
जिल्ह्यातील ४ हजार ४५ नागरिकांना बुधवारी दिवसभरात लस देण्यात आली आहे. यामध्ये १७५७ जणांना पहिला तर २२८८ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटातील ५६ जणांना डोस देण्यात आले. जिल्ह्यातील लस संपली असल्याने आता प्रतीक्षा सुरू आहे.