आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३0 : "जाणीव" हा लघुपट आशयानुसारी दृष्टिकोनीय तंत्राचा वापर करत अंध मुलांच्या जाणिवेला डोळसपणे स्पर्श करतो, असे कौतुकोद्गार समीक्षक व फिल्म क्युरेटर डॉ. अनमोल कोठाडिया यांनी काढले. प्रज्ञान कला अकादमीतर्फे वारणानगर येथे कोरे चित्रपट साक्षरता अभियानांतर्गत "जाणीव" हा लघुपट दाखविण्यात आला. कोल्हापूर येथील या लघुपटाचे लेखक आणि छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळलेले दिग्दर्शक मल्हार जोशी यांनीही रसिकांशी संवाद साधत निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखवली.
सध्या मास कॉमचा विद्यार्थी असणारा मल्हार या लघुपट निर्मिती प्रक्रियेकडे आणि लघुपट प्रदर्शननंतरच्या संवादाकडे एक शिक्षण प्रक्रिया म्हणून पाहतो. हर्ष अहिरे , महावीर कनवाडे असा अभिनय संच असून डबिंग आर्टिस्ट म्हणून श्रीराम मोहीते व आदित्य फलटनकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे. संकलन- मुजीब अत्तार, संगीत - कौशिक बसाक, संवाद- सोनम बाबर तर कलादिग्दर्शन अक्षय कुलकर्णी, संकेत शेडगे , प्रीतम पंडीत यांनी केले आहे.
लालासाहेब घोरपडे, लखन चौधरी, अनिश सोनटक्के, अमर बंडगर यांनी संवादात सहभाग घेतला. रमेश हराळे, निलेश आवटी, केदार सोनटक्के, मंगेश कांबळे सुभाष किल्लेदार यांनी आयोजनात सहभाग घेतला .